ETV Bharat / sitara

'स्वदेस'मधील शाहरुखच्या कावेरी अम्माचे निधन

ख्यातनाम कन्नड अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 'स्वदेस' या हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Kishori Ballal passes away
किशोरी बल्लाळ यांचे निधन
author img

By

Published : Feb 19, 2020, 1:03 PM IST

बेंगळुरू - ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री किशोरी बल्लाळ यांचे ८२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. 'स्वदेस' या चित्रपटातील भूमिका सर्वांच्या मनावर छाप सोडून गेली होती.

वाढत्या वयातील आजारपणामुळे त्यांचे निधन एका खासगी रुग्णालयात झाल्याचे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी सांगितले.

दक्षिण कन्नड जिल्ह्यात जन्मलेल्या किशोरी बल्लाळ यांनी १९६० मध्ये 'इवालेन्ता हेदान्ती' या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर ५ दशके त्या रुपेरी पडद्यावर वावरत राहिल्या. आजवर त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये 'हानी हानी', 'काही', 'सूर्यकांति', 'कॅरी ऑन मराठा' आणि 'क्विक गन मुरगन' या गाजलेल्या चित्रपटांचा समावेश आहे. २००४ मध्ये आलेल्या आशुतोष गोवारीकरच्या 'स्वदेस' चित्रपटात त्यांनी कावेरी अम्मा ही व्यक्तीरेखा सर्वांनाच आवडली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.