ETV Bharat / sitara

सुबोध - भरतची जोडी असलेल्या 'आप्पा आणि बाप्पा' सिनेमाचा ट्रेलर लाँच - aappa and bappa

यापूर्वी भरत आणि सुबोध यांनी 'उलाढाल' या चित्रपटात काम केलं होतं. मात्र, त्यामध्ये त्यांचे फारसे सीन्स एकत्र नव्हते. पण, ही सगळी कसर त्यांनी 'आप्पा आणि बाप्पा' या चित्रपटाद्वारे भरून काढली आहे.

सुबोध - भरतची जोडी असलेल्या 'आप्पा आणि बाप्पा' सिनेमाचा ट्रेलर लाँच
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:49 AM IST

मुंबई - अभिनेता सुबोध भावे आणि भरत जाधव यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आप्पा आणि बाप्पा', असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. यापूर्वी खरं तर भरत आणि सुबोध यांनी 'उलाढाल' या चित्रपटात काम केलं होतं. मात्र, त्यामध्ये त्यांचे फारसे सीन्स एकत्र नव्हते. पण, ही सगळी कसर त्यांनी 'आप्पा आणि बाप्पा' या चित्रपटाद्वारे भरून काढली आहे.

काय आहे कथा -
या चित्रपटाची कथा पुण्यात राहणाऱ्या अप्पा कुलकर्णी म्हणजेच 'भरत'च्या घरात घडते. अप्पाचे वडील म्हणजेच दिलीप प्रभावळकर त्याला यंदाचा गणेशोत्सव थाटात साजरा करायला सांगतात. त्यासाठी त्याला पीएफमधून पैसे काढायला सांगतात.पण ऐनवेळी बँक पैसे द्यायला टाळाटाळ करते. त्यामुळे आप्पाला पैसे उसने घेऊन सण साजरा करावा लागतो. मात्र, ऐनवेळी देणेकरी डोक्यावर येऊन बसतात आणि तो थेट गणपती बाप्पाला आपल्याला या विघ्नातून बाहेर काढायला सांगतो. त्यांनंतर नक्की काय होतं ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

सुबोध - भरतची जोडी असलेल्या 'आप्पा आणि बाप्पा' सिनेमाचा ट्रेलर लाँच

हे आहेत कलाकार -
भरत, सुबोध, दिलीप प्रभावळकर यांच्याप्रमाणेच सुनील जगताप आणि संपदा कुलकर्णी-जोगळेकर हे या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'तुला पाहते रे' आणि 'अश्रूंची झाली फुले' नंतर सुनील आणि सुबोध यांची जोडी या चित्रपटातही एकत्र पाहायला मिळणार आहे. तर, संपदा कुलकर्णी-जोगळेकर ही देखील बऱ्याच दिवसांनी चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

हेही वाचा -'बिग बॉस'मध्ये ढोल ताशाच्या गजरात सलमान खानचे झाले असे शानदार स्वागत

'सन ऑफ सरदार', आणि 'अतिथी तुम कब जाओगे' यासारखा सिनेमाचे दिग्दर्शक अश्विनी धीर यांनी हा चित्रपटात दिग्दर्शित केला आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. तर 'पॅनोरमा फिल्म्स'ने या सिनेमाची प्रस्तुती आणि वितरणाची जबाबदारी घेतली आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

सारंग कुलकर्णी, सायली खरे यांनी सिनेमाला संगीत दिलं असून 'अभंग रिपोस्ट' या बँडने सिनेमासाठी एक खास गाणं तयार केलं आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट रिलीज होतोय..त्यामुळे 'आप्पा आणि बापा'ने रुपेरी पडद्यावर काय धुमाकूळ घातलाय हे तुम्हाला पहायचं असेल तर ११ ऑक्टोबर पर्यत प्रतीक्षा करावी लागेल.

हेही वाचा - पाहा 'बिग बॉसच्या 13 पर्वातील आलिशान घराचे फोटो

Intro:सुबोध भावे आणि भरत जाधव यांची जोडी पहिल्यांदाच एका सिनेमात काम करताना आपल्याला दिसणार आहे. सिनेमाच नाव आहे 'अप्पा आणि बाप्पा'.. या सिनेमाचं ट्रेलर नुकतंच मुंबईत लाँच करण्यात आलं. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

यापूर्वी खर तर भरत आणि सुबोध यांनी उलाढाल या सिनेमात काम केलं होतं मात्र त्या सिनेमात त्यांचे फारसे सीन्स एकत्र नव्हते पण ही सगळी कसर त्यांनी 'अप्पा आणि बाप्पा' या सिनेमाद्वारे भरून काढली आहे.

या सिनेमाची कथा पुण्यात राहणाऱ्या अप्पा कुलकर्णी म्हणजेच भारतच्या घरात घडते. अप्पाचे वडील म्हणजेच दिलीप प्रभावळकर त्याला यंदाचा गणेशोत्सव थाटात साजरा करायला सांगतात. त्यासाठी त्याला पीएफमधून पैसे काढायला सांगतात.पण ऐनवेळी बँक पैसे द्यायला टाळाटाळ करते आणि अप्पाला पैसे उसने घेऊन सण साजरा करावा लागतो.मात्र ऐनवेळी देणेकरी डोक्यावर येऊन बसतात आणि तो थेट गणपती बाप्पाला आपल्याला या विघ्नातून बाहेर काढायला सांगतो त्यांनंतर नक्की काय होत ते ता सिनेमात पहायला मिळेल.

भरत, सुबोध, दिलीप प्रभावळकर यांच्याप्रमाणेच सुनील जगताप आणि संपदा कुलकर्णी-जोगळेकर हे देखील या सिनेमात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तुला पाहते रे आणि अश्रूंची झाली फुले नंतर सुनील आणि सुबोध यांची जोडी या सिनेमातही एकत्र आहेच, तर संपदा कुलकर्णी जोगळेकर ही देखील बऱ्याच दिवसांनी सिनेमात काम करताना दिसणार आहे.

'सन ऑफ सरदार', आणि 'अतिथी तुम कब जाओगे' यासारखा सिनेमाचे दिग्दर्शक अश्विनी धीर यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. तर 'पॅनोरमा फिल्म्स'ने या सिनेमाची प्रस्तुती आणि वितरणाची जबाबदारी घेतली आहे. तर सारंग कुलकर्णी, सायली खरे यांनी सिनेमाला संगीत दिल असून 'अभंग रिपोस्ट' या बँडने सिनेमासाठी एक खास गाणं तयार केलं आहे.

येत्या 11 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा रिलीज होतोय.. त्यामुळे 'अप्पा आणि बापा'नी सिल्व्हर स्क्रीनवर काय धुमाकूळ घातलाय हे तुम्हाला पहायचं असेल तर 11 ऑक्टोबर पर्यत प्रतीक्षा करावी लागेल.

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.