मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'एबीसीडी' चित्रपटाचाच हा तिसरा भाग आहे. रेमो डिसुजा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटाचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. विशेष म्हणजे हिंदीसह हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिश्नन कुमार आणि लिझेले डिसूजा हे करत आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याबाबत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
-
#Announcement: #StreetDancer3D will be released in multiple languages simultaneously: #Hindi, #Tamil and #Telugu... Stars #VarunDhawan, #ShraddhaKapoor, #PrabhuDheva and #NoraFatehi... Directed by Remo D’Souza... 24 Jan 2020 release. pic.twitter.com/T3X7tLLYfb
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#Announcement: #StreetDancer3D will be released in multiple languages simultaneously: #Hindi, #Tamil and #Telugu... Stars #VarunDhawan, #ShraddhaKapoor, #PrabhuDheva and #NoraFatehi... Directed by Remo D’Souza... 24 Jan 2020 release. pic.twitter.com/T3X7tLLYfb
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2019#Announcement: #StreetDancer3D will be released in multiple languages simultaneously: #Hindi, #Tamil and #Telugu... Stars #VarunDhawan, #ShraddhaKapoor, #PrabhuDheva and #NoraFatehi... Directed by Remo D’Souza... 24 Jan 2020 release. pic.twitter.com/T3X7tLLYfb
— taran adarsh (@taran_adarsh) December 17, 2019
हेही वाचा -'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'; पाहा कलाकारांचे फर्स्ट लूक
वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांचे फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. त्यांच्या लूकवरून या चित्रपटात डान्सची जबरदस्त स्पर्धा रंगणार असल्याचा अंदाज येतो.
हेही वाचा -पर्यटन नगरी खजुराहोमध्ये रंगणार सात दिवसीय 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव'
१८ डिसेंबरला ट्रेलर रिलीज होतोय. त्यामुळे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. नववर्षाच्या सुरूवातीलाच हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होत आहे. २५ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल.