मुंबई - रेमो डिसुजा यांचं दिग्दर्शन असलेला 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातलं पहिलं गाणं 'मुकाबला' हे देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रभूदेवा यांच्या 'मुकाबला मुकाबला' या गाण्याचं रिक्रियेटेड व्हर्जन असलेल्या या गाण्यात पुन्हा एकदा प्रभूदेवा यांच्या डान्सची जादू पाहायला मिळते.
१९९४ साली प्रदर्शित झालेल्या प्रभूदेवा यांच्या 'मुकाबला' गाण्याची क्रेझ आजही आहे. तनिष्क बागचीने या गाण्याचे रिक्रियेटेड व्हर्जन तयार केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा -बहुप्रतीक्षित 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' चित्रपटाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला
प्रभूदेवासोबतच वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या डान्सची देखील दमदार झलक या गाण्यात पाहायला मिळते.
ए.आर. रेहमान यांनी या गाण्याच्या मूळ व्हर्जनला कंपोझ केलं होतं. त्यांनी देखील या रिक्रियेटेड व्हर्जनची लिंक सोशल मीडियावर शेअर केली आहे.
सरस डान्स स्टंट्स, ताल धरायला लावणारे संगीत आणि वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही यांचा जबरदस्त परफॉर्मन्स यात पाहायला मिळते. 'एबीसीडी' चित्रपटाचाच हा तिसरा भाग आहे.
हेही वाचा -'स्ट्रीट डान्सर थ्रीडी'; पाहा कलाकारांचे फर्स्ट लूक
हिंदीसह तेलुगू आणि तमिळ भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, क्रिश्नन कुमार आणि लिझेले डिसूजा हे करत आहेत.
२४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -सारा, क्रिती आणि नुसरत बद्दल कार्तिकने केला उलगडा, करिनाच्या शोमध्ये व्यक्त केल्या भावना