ETV Bharat / sitara

कलाकारांपेक्षा माझ्यासाठी कथा अधिक रोमांचक - नाग अश्विन

दिग्दर्शक नाग अश्विन अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पादुकोण यांच्यासह मेगा-बजेट चित्रपट बनवणार आहे. या कास्टिंगमुळे चाहत्यांना उत्तेजन मिळालं आहे, पण आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनातल्या या तीन मोठ्या कलाकारांपेक्षा नाग अश्विनचे मन कथेत गुंतले आहे.

Nag Ashwin
नाग अश्विन
author img

By

Published : Feb 17, 2021, 5:28 PM IST

हैदराबाद: राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट निर्माता नाग अश्विनने आपल्या आगामी बहुभाषिक चित्रपटासाठी स्वप्नवत कास्ट निष्चित केली आहे. अश्विनच्या आगामी चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन, पॅन-इंडिया स्टार प्रभास आणि पॉवरहाऊस प्रतिभा दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पण कलाकारांपेक्षा कथेमुळे अश्विन जास्त उत्साहित असल्याचे सांगतो.

पिट्टा कथालू या तेलुगु कथा वाचनातून नाग अश्विन यांनी चित्रपट निर्माते थरुन भास्कर, बी.व्ही. नंदिनी रेड्डी आणि संकल्प रेड्डी यांच्याशी या चित्रपटाच्या कथेबद्दल संवाद साधला. पिट्टा कथालूच्या प्रमोशन दरम्यान नाग अश्विनला विचारले गेले होते की प्रभास, दीपिका आणि बिग बी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटात या कलाकारांचा अभिनय कसा असेल? आपल्याकडे जी कथा आहे त्यात हे कलावंत भूमिका करणार आहेत ही गोष्ट जास्त रोमांचक वाटते असे नाग अश्विन म्हणाले.

या बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती दक्षिण भारतीय प्रोडक्शन हाऊस वैजयंती मूव्हीज करणार आहे. महानटी, अग्नि पर्वताम आणि इंद्रा या लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती या अगोदर या प्रॉडक्शनने केली आहे. यापूर्वी बॉलिवूडच्या बिग बी आणि दीपिका या दोन स्टार कलाकारांनी आरक्षण आणि पीकू या चित्रपटात एकत्र काम केले होते.

नाग अश्विन यांच्या चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरले नसून २०२२ मध्ये हा चित्रपट रिलीज होईल.

हेही वाचा -लूप लपेटा’मध्ये रोमँटिक शैलीत तापसी पन्नू आणि ताहिर राज भसीन!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.