मुंबई - बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची जगभरात फॅन फोलोविंग पाहायला मिळते. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. मात्र, शाहरुख स्वत: एका हॉलिवूड सुपरस्टारचा जबरा फॅन आहे. अलिकडेच त्याने आपल्या या 'हिरो'ची भेट घेतली. त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन त्याने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शाहरुखने काही दिवसांपूर्वीच सौदी अरब येथील एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. जॉय फोरमच्या दोन दिवसीय महोत्सवात बऱ्याच आंतरराष्ट्रीय कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी जीन क्लाऊड, जॅकी चॅन यांसारख्या सुपरस्टार्सचीही उपस्थिती होती. यामध्ये जीन क्लाऊड वान डॅम हा एक लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -'वॉर' चित्रपटाची विदेशातही क्रेझ, हृतिकच्या 'या' चित्रपटांचा मोडला रेकॉर्ड
शाहरुख खान हॉलिवूडचे सुपरस्टार जॅकी चन यांचा जबरा फॅन आहे. त्यांची भेट घेऊन शाहरुखने त्यांच्यासोबत सेल्फीदेखील काढला. हा फोटोमध्ये शाहरुखच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे पाहायला मिळतो.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, शाहरुख हॉलिवूडचे होस्ट डेव्हिड लेटरमॅन यांचा शो 'माय नेक्स गेस्ट निड्स नो इंट्रोडक्शन'च्या नव्या सीझनमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा -तब्बल ६ वेळा गोविंदानं बदललं स्वत:चं नाव; केले धक्कादायक खुलासे
आपल्या 'झिरो' चित्रपटानंतर तो कोणत्याही चित्रपटात झळकला नाही. मात्र, एक - दोन महिन्या आपल्या नव्या चित्रपटाचीही घोषणा करणार असल्याचं शाहरुखने सांगितलं.