ETV Bharat / sitara

शाहरुखच्या लेकीचा अभिनयात डेब्यू, पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

author img

By

Published : Sep 30, 2019, 7:59 AM IST

'द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू' असं या लघुचित्रपटाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच सुहानाचा या चित्रपटातील पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला होता. तसंच, पहिलं पोस्टरही तिने शेअर केलं होतं.

शाहरुखच्या लेकीचा अभिनयात डेब्यू, पहिल्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

मुंबई - बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना हिच्या बॉलिवूड पदापर्णाच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होत्या. अलिकडेच सुहानाने तिचं शिक्षणही पूर्ण केलं आहे. न्यूयॉर्कमध्ये आता ती अभिनयाचे धडे गिरवत आहे. यासोबतच तिचा अभिनयातही डेब्यू झाला आहे. एका लघुपटामध्ये ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या लघुपटाचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे.

'द ग्रे पार्ट ऑफ ब्ल्यू' असं या लघुचित्रपटाचं नाव आहे. काही दिवसांपूर्वीच सुहानाचा या चित्रपटातील पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला होता. तसंच, पहिलं पोस्टरही तिने शेअर केलं होतं. आता तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर या लघुचित्रपटाचा टीझरही शेअर केला आहे. या टीझरमध्ये तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते. Theodone Gimeno हे चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

हेही वाचा -हेमंत ढोमे म्हणतोय...'आय वॉन्ट टर्मरिक ऑन एव्हरी बॉडी', 'सातारचा सलमान' चित्रपटातील दुसरे हळदीचे गाणे प्रदर्शित

सुहानाने लंडनच्या 'Ardingly College' मधून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वीच सुहानाच्या बऱ्याच फोटोशूटची चर्चा असते. तिला शाहरुखप्रमाणेच अभिनयात आपली ओळख तयार करायची आहे. त्यासाठी ती सध्या मेहनत घेत आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 'लता 90' या पुस्तकाचे प्रकाशन

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.