मुंबई - दाक्षिणात्य सिनेस्टार दुलकर सलमानचा आज ३३ वा वाढदिवस आहे. दुलकरने 'कारवां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्याची मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे. आता बॉलिवूडमध्येही तो त्याची ओळख निर्माण करू लागला आहे. लवकरच तो अभिनेत्री सोनम कपूरसोबत 'जोया फॅक्टर' या चित्रपटात झळकणार आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त सोनमने एक फोटो शेअर करुन त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनम कपूरने 'जोया फॅक्टर' चित्रपटातीलच दुलकरसोबतचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. तसेच, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'जोया फॅक्टर' चित्रपटाबाबत सांगायचे झाले तर, क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू असतानाच हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र, पुढे त्याची रिलीज डेट बदलण्यात आली. 'जोया फॅक्टर' या पुस्तकावर आधारित या चित्रपटाची कथा आहे. सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा हे करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दुलकर आणि सोनम कपूर पहिल्यांदाच एकत्र पडद्यावर झळकतील.