ETV Bharat / sitara

'दबंग गर्ल'ची बॉलिवूडमध्ये ९ वर्षे पूर्ण, आठवणींना दिला उजाळा - sonakshi salman movie

सोनाक्षीने आपल्या पोस्टमध्ये तिच्या फिल्मी प्रवासाला उजाळा दिला आहे. '९ वर्षाआधी १० सप्टेंबर २०१०ला 'दबंग' चित्रपटात भूमिका साकारण्याची सुरुवात केली होती.

'दबंग गर्ल'ची बॉलिवूडमध्ये ९ वर्षे पूर्ण, आठवणींना दिला उजाळा
author img

By

Published : Sep 13, 2019, 8:48 PM IST

मुंबई - 'दबंग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सोनाक्षी सिन्हा हिने सिनेसृष्टीत ९ वर्षे पूर्ण केली आहेत. तिची 'दबंग'मधील 'रज्जो'ची भूमिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरली होती. पहिल्याच चित्रपटात सलमान खानसोबत तिला ब्रेक मिळाल्याने दोघांची जोडी देखील लोकप्रिय ठरली. सिनेसृष्टीतला ९ वर्षाचा प्रवास खूप काही शिकण्यासारखा होता, असं म्हणत सोनाक्षीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

सोनाक्षीने आपल्या पोस्टमध्ये तिच्या फिल्मी प्रवासाला उजाळा दिला आहे. '९ वर्षाआधी १० सप्टेंबर २०१०ला 'दबंग' चित्रपटात भूमिका साकारण्याची सुरुवात केली होती. त्या दिवसांपासून माझा चित्रपटसृष्टीत प्रवास सुरू झाला. सर्वकाही अगदी कालच घडल्यासारखं वाटत आहे. हा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय आणि खूप काही शिकण्याचा होता', असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

sonakshi sinha share post as she completed 9 years in bollywood
सोनाक्षीने शेअर केलेली पोस्ट

हेही वाचा-यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून दिशा पटाणी देणार फिटनेस फंडे, शेअर केला पहिला व्हिडिओ

सोनाक्षीने आजपर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यापैकी तिचा अक्षय कुमारसोबतचे 'रावडी राठोड', 'मिशन मंगल' या चित्रपटांनी १०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली. तर, सलमान खानसोबतच्या 'दबंग' चित्रपटानेही १०० कोटीपेक्षा जास्त गल्ला जमवला होता.

तिचे 'अकिरा', 'हॅप्पी फिर भाग जायेंगी','खानदानी शफाखाना', आणि 'कलंक' या चित्रपटांना प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, अलिकडेच ती 'मिशन मंगल' चित्रपटात झळकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवलं आहे.

हेही वाचा-पाहा, केनीयाच्या 'शाहरुख-काजोल'चा व्हायरल व्हिडिओ

सोनाक्षीची आता 'दबंग ३'मध्येही सलमान खानसोबत वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच सोनाक्षीचा पहिला लूकही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर, अलिकडेच, सलमान खाननेही या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता.

सलमान आणि सोनाक्षीची जोडी पुन्हा एकदा 'दबंग ३'मध्ये झळकणार असल्याने चाहत्यांनाही या चित्रपटाची उत्सुकता आहे.

हेही वाचा-द्वारकाधीशच्या दर्शनात बॉलिवूडची 'क्विन' लीन, पाहा व्हिडिओ

Intro:Body:

new

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.