ETV Bharat / sitara

सुजय डहाके दिग्दर्शित 'श्यामची आई' पूर्णतः शूट होणार ‘ब्लॅक अँड व्हाईट’ मध्ये!

'श्यामची आई' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय सुजयने घेतला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यात येणार आहे.

Shyamchi aai film black and white shoo
ब्लॅक अँड व्हाईट शूट श्यामची आई
author img

By

Published : Aug 16, 2021, 3:11 AM IST

मुंबई - कोरोनाचे संकट हळूहळू सरताना आणि मनोरंजनसृष्टीची गाडी पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीत सकारात्मकता आली आहे. अशात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत दिग्दर्शक सुजय डहाकेने काल पोस्टर रिलीजच्या माध्यमातून आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करत महाराष्ट्रातील तमाम रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'श्यामची आई' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय सुजयने घेतला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करण्यात येणार आहे.

हेही वाचा - VIDEO : रुबीना दिलैकने घेतले नवे चॅलेंज, पाईपवरुन केला ओढा पार

..यामुळे शूटिंग ब्लॅक अँड व्हाईट

'शाळा', 'फुंतरू', 'आजोबा', 'केसरी' असे एका पेक्षा एक प्रवाहापेक्षा वेगळे चित्रपट बनवणारा तरुण दिग्दर्शक सुजय डहाके पुन्हा एकदा एका नव्या आव्हानासह रसिकांच्या भेटीला आला आहे. नेहमीच स्वत:समोर वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट बनवण्याची आव्हाने उभी करत ती यशस्वीपणे पार करणारा सुजय आता इतिहासाची पाने उलगडण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. सुजयने 'श्यामची आई' या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची जबाबदारी उचलली आहे. यंदाचे वर्ष भारतीय सिनेसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांच्या १५० व्या जयंतीचे आहे. याच पुण्यपर्वाचे औचित्य साधत 'श्यामची आई' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय सुजयने घेतला आहे. या चित्रपटाचे शूटिंग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करून प्रेक्षकांचा नॅास्टेल्जिया जागृत करत त्यांना १९ व्या शतकात नेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

जुन्या 'श्यामची आई' या चित्रपटाशी काहीही संबंध नाही - सुजय

या चित्रपटाचा जुन्या 'श्यामची आई' या चित्रपटाशी काहीही संबंध नाही. अमृता अरुण राव यांची निर्मिती असलेला 'श्यामची आई' हा चित्रपट पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींच्या मूळ कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाची बरीच वैशिष्ट्ये असतील. यातील प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट असेल. या चित्रपटात ब्रिटिश राजवटीतील १९१२ ते १९४७ पर्यंतचा काळ पहायला मिळणार आहे. 'शाळा' या पहिल्या चित्रपटापासून सुजयच्या मनात 'श्यामची आई' हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट बनवण्याचा विचार घोळत होता. इतर चित्रपटांसाठी काम करताना दुसरीकडे सुजयचा या चित्रपटावर रिसर्चही सुरू होता. यासाठी आपण पाच-सहा वर्षे मेहनत घेतली असून, 'श्यामची आई' बनवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ असल्याचे सुजयचे म्हणणे आहे.

ऑडीशनच्या माध्यमातून सर्व कलाकारांची होणार निवड

हा चित्रपट साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारीत असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कादंबरीतील बऱ्याच गोष्टी अन्वेषित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत, ज्या आचार्य अत्रेंच्या 'श्यामची आई' चित्रपटात करण्यात आल्या नव्हत्या. अद्याप या चित्रपटातील कलाकारांची निवड करण्यात आलेली नसून, ऑडीशनच्या माध्यमातून सर्व कलाकारांची निवड केली जाणार आहे. 'श्यामची आई' हा चित्रपट पुढल्या वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे.

हेही वाचा - VIDEO : राखी सावंतने दाखवला नागिन अवतार, फॅन्स म्हणाले - 'सुरीली नागिन'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.