मुंबई - अभिनेत्री श्रध्दा कपूर उत्तम मराठी बोलते हे बऱ्याच जणांना माहीत असेल. हिंदी सिनेसृष्टीत गाजलेली अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे ही तिची मावशी. पंढरीनाथ कोल्हापूरे हे मराठीतील उत्तम संगीकार गायक श्रध्दाचे आजोबा आहेत. त्यामुळे तिला उत्तम मराठी लिहिता बोलता येते. तिने आपल्या बॉडीगार्डला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
श्रध्दाच्या बॉडीगार्डचे काम अतुल कांबळे करीत असतो. तिच्या पाठीशी तो ठामपणे उभे राहून तिला सुखरूप कार्यक्रमस्थळी पोहोचवतो. सर्व प्रकारच्या इव्हेन्टमध्ये तिला त्रास होऊ नये म्हणून तिची ढाल बनून तो फिरत असतो. अशा या अतुल कांबळेचा वाढदिवस होऊन गेला. त्याला श्रध्दाने मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर अतुलसोबतचा फोटो पोस्ट करत तिने त्याला शुभेच्छा देताना लिहिलंय, 'माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि अप्रतिम माणसाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. मला नेहमी सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. अतुल, तुझ्यासारखा व्यक्ती माझ्या आयुष्यात असणं याला मी माझं भाग्य मानते. तुला सुख, शांती आणि तुला जे हवं ते सर्व काही लाभो!, असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.