हैदराबाद: अभिनेता सैफ अली खान आणि प्रभास यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ओम राऊतच्या आदिपुरुष चित्रपटाच्या शुटिंगचा आरंभ करण्यात आला. बाहुबली फेम अभिनेता प्रभासने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर केलंय त्यावर लिहिलंय ''आरंभ''.
आदिपुरुषच्या प्री प्रॉडक्शनला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली होती. आता या चित्रपटाच्या प्रत्यक्ष शुटिंगला सुरवात झाली असून शूटिंगला सुरुवात झाल्याची घोषणा करत प्रभासने पोस्टच्या कॅप्शनमध्ये "#Adpurush arambh #SaifAliKhan @omraut" असं लिहिलं आहे.
या चित्रपटात प्रभास आदिपुरुषची मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत, तर सैफ मुख्य खलनायक लंकेशच्या भूमिकेत अवतरणार आहे. ज्याला निर्मात्यांनी यापूर्वी “जगातील सर्वात बुद्धिमान राक्षस” म्हणून संबोधले होते.
थ्रीडी फीचर फिल्म असलेला हा चित्रपट भारतीय महाकाव्याचे रूपांतर आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण हिंदी आणि तेलगूमध्ये केले जाईल आणि तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतर अनेक विदेशी भाषांमध्ये या चित्रपटाचे डबिंग केले जाईल.
भूषण कुमार, कृष्ण कुमार, ओम राऊत, प्रसाद सुतार आणि राजेश नायर निर्मित हा चित्रपट २०२२ मध्ये मोठ्या पडद्यावर उतरणार आहे.
हेही वाचा - हास्यजत्रे’चे पडद्यामागील ‘सचिन आणि सचिन’ हसविण्यासाठी स्वतः अवतरणार सर्वांसमोर!