ETV Bharat / sitara

शिवराज्याभिषेकाचा भव्यदिव्य थाट, 'हिरकणी' चित्रपटाचं गाणं प्रदर्शित - सुहास जोशी

९ मराठी कलाकार, ६ लोककला प्रकारांचा या एकाच गाण्यात समावेश आहे. नुकतंच हे भव्यदिव्य असं गाणं प्रदर्शित करण्यात आलं.

शिवराज्याभिषेकाचा भव्यदिव्य थाट, 'हिरकणी' चित्रपटाचं गाणं प्रदर्शित
author img

By

Published : Sep 10, 2019, 11:08 PM IST

मुंबई - शिवराज्याभिषेकावर आतापर्यंत अनेक गाणी आली. मात्र, प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' या चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचं गाणं या सर्व गाण्यांमध्ये वेगळे ठरणार आहे. याला कारणही असंच आहे. ९ मराठी कलाकार, ६ लोककला प्रकारांचा या एकाच गाण्यात समावेश आहे. नुकतंच हे भव्यदिव्य असं गाणं प्रदर्शित करण्यात आलं.

अभिनेता चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, क्षिती जोग, राजश्री ठाकूर, संगीतकार राहुल रानडे या गाण्यात दिसत आहेत. तर ओवी, पोवाडा, कव्वाली, अभंग, धनगर, शेतकरी अशा सहा पारंपरिक लोककलांचा या गाण्यात समावेश आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची भव्यता दर्शवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. या गाण्याचं लेखन कविभूषण,संदीप खरे यांनी केलं आहे. तर, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीलांबरी किरकिरे, विवेक नाईक, अमितराज, दीपाली देसाई, जिया सुरेश वाडकर, गौरव चाटी, संतोष बोटे या नवोदित गायक आणि गायिकांच्या सुमधुर आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. चित्रपटाचे लेखन चिन्मय मांडलेकर, छायाचित्रण संजय मेमाणे तर कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. सुभाष नकाशे यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

shivrajyabhishek event in hirkani marathi film song
'हिरकणी' टीम

हेही वाचा-आयुष्मान-भूमीच्या चाहत्यांची चंगळ, 'शुभमंगल ज्यादा सावधान'चा झाला मुहूर्त

इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापूसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी निभावली आहे. 'कच्चा लिंबू' या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर प्रसाद ओकचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे.

शिवराज्याभिषेकाचा सोहळा चित्रपटातील भाग आहे. त्याची भव्यता गाण्यातून दिसावी हा प्रयत्न होता. तसंच विविध पैलू उलगडण्याचाही विचार होता. त्यासाठी या वेगळ्या पद्धतीनं गाणं करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंतच्या शिवराज्याभिषेकाच्या गाण्यांत हे गाणं निश्चितपणे वेगळं ठरेल,' असं दिग्दर्शक प्रसाद ओकनं सांगितलं. येत्या दिवाळीत 'हिरकणी' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-हासू आणि आसू यांचा मिलाफ असलेला 'द स्काय ईझ पिंक' ट्रेलर अखेर रिलीज

Intro:गाण्याची लिंक -
https://youtu.be/gxcJ8EPrMaE

शिवराज्याभिषेकावर आतापर्यंत अनेक गाणी आली. मात्र, प्रसाद ओक दिग्दर्शित हिरकणी या चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचे गाणे या सर्व गाण्यांमध्ये वेगळे ठरणार आहे. कारण नऊ मराठी कलाकार, सहा लोककला प्रकारांचा या एकाच गाण्यात समावेश आहे. नुकतंच हे भव्यदिव्य असं गाणं लाँच करण्यात आलं.

इरादा एंटरटेन्मेंटच्या फाल्गुनी पटेल यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. लॉरेन्स डिसुझा सहनिर्माते आहेत. तर राजेश मापुसकर यांनी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जबाबदारी निभावली आहे. "कच्चा लिंबू" या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटानंतर प्रसाद ओकचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, क्षिती जोग, राजश्री ठाकूर, संगीतकार राहुल रानडे या गाण्यात दिसत आहेत. तर ओवी, पोवाडा, कव्वाली, अभंग, धनगर, शेतकरी अशा सहा पारंपरिक लोककलांचा या गाण्यात समावेश आहे. शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची भव्यता दर्शवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. या गाण्याचं लेखन कविभूषण,संदीप खरे यांनी केलं असून, अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. नीलांबरी किरकिरे, विवेक नाईक, अमितराज, दीपाली देसाई, जिया सुरेश वाडकर, गौरव चाटी, संतोष बोटे या नवोदित गायक आणि गायिकांच्या सुमधुर आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. चित्रपटाचे लेखन चिन्मय मांडलेकर, छायाचित्रण संजय मेमाणे तर कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. सुभाष नकाशे ह्यांनी नृत्यदिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे.

शिवराज्याभिषेकाचा सोहळा चित्रपटातील भाग आहे. त्याची भव्यता गाण्यातून दिसावी हा प्रयत्न होता. तसंच विविध पैलू उलगडण्याचाही विचार होता. त्यासाठी या वेगळ्या पद्धतीनं गाणं करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंतच्या शिवराज्याभिषेकाच्या गाण्यांत हे गाणं निश्चितपणे वेगळं ठरेल,' असं दिग्दर्शक प्रसाद ओकनं सांगितलं.

येत्या दिवाळीत हिरकणी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.