ETV Bharat / sitara

नरेद्र मोदी यांचे अभिनंदन करणाऱ्या शबाना आझमींवर उठली टीकेची झोड - Shabana Azami trolled

शबाना आझमी यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले. परतु मोदी समर्थकांना ही गोष्ट पटलेली नाही. त्यांनी शबाना यांना ट्रोल करीत भारत सोडण्यापर्यंतचा सल्ला दिलाय.

शबाना आझमींवर उठली टीकेची झोड
author img

By

Published : May 24, 2019, 10:40 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रीटीजनीदेखील मोदींचे अभिनंदन केले. अभिनेत्री शबाना आझमी यांनी मोदी यांना ट्विट करुन विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.

शबाना आझमी यांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या मात्र कट्टर मोदी समर्थकांना ही गोष्ट पटलेली नाही. शबाना यांना युजर्सनी ट्रोल करायला सुरूवात केली आहे. काहींनी त्यांना पाकिस्तानला जायचा सल्ला दिलाय तर काहींनी त्यांना डोळे पुसण्यासाठी रुमाल भेट म्हणून पाठवलाय. काही जणांनी त्यांना काळजावर दगड ठेवून ट्विट करणारी असे उपरोधाने म्हटलंय. काही युजरनी त्यांना भारत कधी सोडणार आहात असे विचारलंय.

शबाना आझमी यांनी यंदाच्या निवडणूकीत बेगुसराई लोकसभा मतदार संघात जाऊन कन्हैय्या कुमार याचा प्रचार केला होता. त्या नेहमीच डाव्या विचारांसाठी ओळखल्या जातात. त्या सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रियादेखील देत असतात. तिथेही त्यांना ट्रोल करणारे असतातच. एकंदरीत मोदी समर्थक या ट्विटला खिलाडूवृत्तीने पाहायला तयार नाहीत.

Intro:Body:

ent 005

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.