ETV Bharat / sitara

प्रसिद्ध कथालेखक सागर सरहदी यांचे निधन - kaho na pyar hai

'चांदनी', 'कहो ना प्यार है' या लोकप्रिय चित्रपटांची कथा लिहिणारे लेखक सागर सरहदी यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. पाच दशकांच्या करकीर्दीत त्यांनी 'कभी कभी', 'सिलसिला', 'रंग', 'जिंदगी' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचे कथालेखन केले.

sagar sarhadi
sagar sarhadi
author img

By

Published : Mar 22, 2021, 3:24 PM IST

Updated : Mar 22, 2021, 6:39 PM IST

मुंबई - 'चांदनी', 'कहो ना प्यार है', 'जिंदगी' या लोकप्रिय चित्रपटांचे कथालेखन करणारे लेखक सागर सरहदी यांनी सोमवारी मुंबईत सायन येथे अखेरचा श्वास घेतला. ते ८८ वर्षांचे होते. सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सुप्रिसध्द निर्माते रमेश तलवार हे त्यांचे भाचे आहेत.

सागर सरहदी यांचा जन्म ११ मे १९३३ रोजी पाकिस्तान येथील अबोटाबाद येथे झाला. पाकिस्तान सोडून आल्यानंतर ते सुरूवातीला दिल्ली अणि नंतर मुंबईत वास्तव्यास होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी संवाद तसेच कथा लेखन केले. यशराज चोप्रा दिग्दर्शीत रेखा, अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला 'कभी कभी' या चित्रपटाने ते प्रकाशझोतात आले.

गंगा सागर तलवार हे नाव अनेकांना अपरिचित वाटत असेल परंतु प्रतिभेने काठोकाठ भरलेलं हे व्यक्तिमत्व होतं. होतं यासाठी की आजच गंगा सागर तलवार उर्फ सागर सरहदी यांना देवाज्ञा झाली. त्यांचा जन्म १९३३ मध्ये उत्तर-पश्चिम सीमेवरील प्रांतात झाला. त्यामुळेच आणि आपले अस्तित्व त्या सीमा भागाशी (हिंदीत सीमेला सरहद म्हणतात) आयुष्यभर जुळून ठेवण्यासाठी त्यांनी सागर सरहदी हे टोपण नाव ल्यायले आणि नंतर त्याच नावाने लेखन करू लागले. भारत -पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित होऊन त्यांनी लेखणी हातात धरली ती शेवटचा श्वास घेईपर्यंत. सीमाभागात त्यांच्या प्रतिभेला म्हणावा तसा वाव मिळत नव्हता म्हणून त्यांनी तेथील गाशा गुंडाळत बॉम्बे (आताची मुंबई) गाठले व अर्थार्जनासाठी आपल्या भावाचे कपड्यांचे दुकान चालविण्यात मदत केली. कॉलेज सुरु होते. परंतु त्यांच्यातील अंतर्गत कलाकारीता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि त्यांनी आपला मोर्चा चित्रपटसृष्टीकडे वळविला.

हेही वाचा - राम गोपाल वर्माचा 'डी कंपनी' रिलीज न होण्याचे 'हे' आहे खरे कारण!

या प्रतिभासंपन्न लेखकाला पहिली संधी मिळाली ‘पत्नी’ साठी. पत्नी (१९७०) हे चित्रपटाचे नाव जो व्ही आर नायडू यांनी दिग्दर्शित केला होता. नायडू यांनी त्याआधी देव आनंद च्या ‘तीन देवीयां’ मध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी बासू भट्टाचार्य यांच्या ‘अनुभव’ या चित्रपटासाठी संवाद लिहिले. सागर ‘कहो ना प्यार है’ (२०००) चे सह-पटकथा-लेखक होते हनी इराणी आणि रवि कपूर यांच्यासह. त्यांनी अमिताभ बच्चन, शशी कपूर, रेखा आणि जया बच्चन यांच्या भूमिका असलेल्या यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’ या चित्रपटाचे पटकथा लेखक म्हणून काम केले. ‘चांदनी’, ज्यात स्व.श्रीदेवी होती, सुद्धा त्यांच्याच लेखणीतून उतरला होतं. तसेच शाहरुख खानच्या 'दिवाना' ची स्क्रिप्टही सरहदी यांनीच लिहिलेली आहे. चरित्र अभिनेते मनमोहन कृष्णा यांनी ‘नूरी’ चित्रपटातून दिग्दर्शनीय पदार्पण केले त्या चित्रपटाचे लेखनही सागर सरहदी यांचे होते.

लेखनासोबत दिग्दर्शनही
खरंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील चकाचक व मसाला चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केले तरी त्यांच्यातील हळवा कलाकार काहीतरी वेगळे करू इच्छित होता. त्यामुळेच सागर सरहदी यांनी १९८२ साली ‘बाझार’ सारखा वास्तविकतेला धरून चालणारे कथानक असलेला चित्रपट बनविला. त्यांच्या या पदर्पणीय चित्रपटात नासिरुद्दीन शहा, स्मिता पाटील, फारुख शेख, सुप्रिया पाठक (कपूर) यासारखे कलाकार होते जे त्याकाळी समांतर सिनेमासाठी आग्रही होते. या चित्रपटाला चांगला लौकिक मिळाला तरीही सरहदी यांनी दिग्दर्शित केलेला ‘चौसर’ डब्यात पडून राहिला. संवेदनशील विषयांना त्यावेळी ‘बाझार’ नव्हता व सागर सरहदी थोडेफार नाउमेद झाले परंतु त्यांनी वास्तविक सिनेमाची कास सोडली नाही. सागर सरहदी यांनी ‘तेरे शहर में’ नामक चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होतं ज्यात नासिरुद्दीन शहा, स्मिता पाटील, दीप्ती नवल आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तोसुद्धा प्रदर्शित होऊ शकला नाही परंतु एखाद-दुसऱ्या फिल्म फेस्टिवल मध्ये तो दाखविला गेला होता. आपल्या कलेशी प्रामाणिक राहता यावे यासाठी सरहदी अविवाहित राहिले.

हेही वाचा - इंडियन आयडॉलच्या मंचावर शिल्पा शेट्टीने दिला ‘बाजीगर’च्या गोष्टींना उजाळा

सागर सरहदी गेले काही आठवडे हॉस्पिटल मध्ये होते व हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ईटीव्ही भारत मराठी परिवाराकडून श्री सागर सरहदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Last Updated : Mar 22, 2021, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.