मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिने अल्पावधितच चाहत्यांची लोकप्रियता मिळवली आहे. सुरुवातीला ती सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी म्हणूनच ओळखली जात होती. मात्र, तिने बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या सर्वांचं श्रेय ती एका खास व्यक्तीला देते. ही व्यक्ती आपली प्रेरणा असल्याचं तिने एका पोस्टमधून म्हटले आहे.
साराच्या आयुष्यातील ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तिची आई आणि अभिनेत्री अमृता सिंग आहे. आपल्या आईसोबतचा एक फोटो कोलाज करून साराने सोशल मीडियावर आपल्या आईप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा -'या' खास ठिकाणी विराट - अनुष्का करणार नववर्षाचे स्वागत, पाहा फोटो
'हा आरसा आहे, की कोणते प्रतिबिंब? आमच्यामध्ये फक्त एवढाच फरक आहे, की तिचे संपूर्ण लक्ष फक्त माझ्याकडे असावे, अशी माझी इच्छा असते. ती प्रेम आणि वात्सल्याने परिपूर्ण आहे. तिच्यामध्ये खूप उर्जा आहे. ती माझा आधार, माझी प्रेरणा आणि माझ्या आयुष्यातील जादूगर आहे. माझा सर्व तणाव तिच्यामुळे क्षणात दूर होतो', असे साराने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे.
यासोबतच तिने अमृता ही 'मम्मी नंबर वन' असल्याचंही लिहिलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सारा लवकरच वरुण धवनसोबत 'कुली नंबर १' चित्रपटात भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. कार्तिक आर्यन आणि साराची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाची उत्सुकता आहे. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -कंगना रनौत, करिना कपूरचं विंटर सेशन, कडाक्याच्या थंडीत अशी करताहेत धमाल