मुंबई - अभिनेत्री सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर सिम्बा हा चित्रपटदेखील हिट ठरला. त्यानंतर तिचा चाहता वर्ग खूप वाढला आहे. सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. अलिकडेच तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. तो फोटो आता व्हायरल झाला आहे.
लाल ड्रेसमधील साराच्या या सुंदर फोटोत तिने गळ्यात सोनेरी रंगाचा नेकलेस घातला आहे. कानात मॅचिंग हइअर रिंग्ज आहेत. या फोटोला तिने लिहिलेली कॅप्शनदेखील इंटरेस्टींग आहे.
या फोटोवर भले भले फॅन्स तिच्यावर भाळले आहेत. एकाने तर तिला चक्क प्रपोज केले आहे. ''माझ्यासोबत ७ फेरे घेशील का ?" असे या चाहत्यांने लिहिलंय.
कामाच्या पातळीवर सारा अली खान सध्या फिल्म 'लव आजकल 2' या सिनेमात काम करीत आहे. यात तिची कार्तिक आर्यनसोबत जोडी आहे. रणवीरसोबत सिम्बामध्ये पाहिलेली ऑन स्क्रिन केमेस्ट्री कार्तिक आर्यनसोबत कशी जमेल हे लवकरच कळेल.