मुंबई - प्रसिद्ध हरियाणी डान्सर सपना चौधरी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच सपनाने लॉकडाऊनसंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला होता. आता तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. १४ सेकंदच्या या व्हिडिओमध्ये सपनाचा नवा लूक पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये तिच्यासोबत आणखी ४ महिला कलाकार आहेत.
या व्हिडिओमधून ती नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करत आहे. यासोबतच सामाजिक अंतर ठेवणे आणि हात वारंवार सॅनिटायझरने धुण्याबाबतही ती लोकांमध्ये जागृती करत आहे. याशिवाय व्हिडिओच्या माध्यमातून तिने सैनिक, पोलीस, डॉक्टर आणि लॉकडाऊनदरम्यानही आपले काम करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. यासोबत लॉकडाऊनच्या काळात सरकारच्या नियमांचे पालन करणाऱ्या जनतेचेही तिने आभार मानले आहेत.