मुंबई - अभिनेता संजय मिश्रा आणि दीपक डोबरियाल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'कामयाब' या कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
ट्रेलरच्या सुरूवातीला एका काळात प्रसिध्द असलेला सहकलाकार संजय मिश्राच्या प्रमुख भूमिकांचा फ्लॅशबॅक दाखवला जातो. फ्लॅशबॅकमधून बाहेर आल्यानंतर दिसते की चांगला सपोर्ट आर्टीस्ट असूनही त्याची स्थिती बदललेली नाही.
चित्रपटात नाट्य तेव्हापासून सुरू होते जेव्हा संजय मिश्राला कळते, की त्याने आजपर्यंत ४९९ चित्रपटात कम केले आहे. आणि तो ५०० चित्रपटांचा टप्पा पूर्ण करण्याच्या मोहिमेवर निघतो.
अनेक चढ उतार येऊनही संजय मिश्रा हार मानत नाही. यात त्याला साथ मिळते ती कास्टींग डायरेक्टर दीपिक डोबरियाल याची. या संपूर्ण प्रवासावर संजय मिश्रांचा एक डायलॉग चपखल बसतो. तो म्हणतो, 'जस्ट एन्जॉय लाइफ, और ऑप्शन भी क्या है?'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
संजय मिश्रा आणि दीपिक डोबरियाल यांचे परफेक्ट कॉमेडी टायमिंग , इमोशन आणि ड्रामा याचे भरपूर सिक्वेन्स ट्रेलरमध्ये दिसतात.
हार्दिक मेहता यांनी दिग्दर्शित केलेला 'कामयाब' हा चित्रपट ६ मार्चला थिएटरमध्ये झळकणार आहे.