ETV Bharat / sitara

पडद्यावर ‘मॅजिक’ निर्माण करणाऱ्या संजय जाधवने सुरु केली ‘फिल्म मॅजिक फिल्म स्कूल’!

‘दुनियादारी’ चित्रपटाचा दिग्दर्शक संजय जाधवने आता आपले अनुभव पुढच्या पिढीला उपयोगी पडतील हे जाणून त्यांच्या फायद्यासाठी एक चित्र-शाळा उभारली आहे. त्यांच्या ‘फिल्म मॅजिक फिल्म स्कूल’ चे नुकतेच उदघाटन झाले चमचमत्या सिताऱ्यांच्या सान्निध्यात.

author img

By

Published : Feb 20, 2021, 12:29 PM IST

Sanjay Jadhav
संजय जाधव

संजय जाधव ही मनोरंजनसृष्टीतील एक ऑल-राऊंडर व्यक्ती आहे. त्यांचे सिनेमाविषयीचे पॅशन फार कमी जणांमध्ये आढळून येते. जेव्हा त्यांचा ‘दुनियादारी’ प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाही वाटले नव्हते की तो मराठी चित्रपटांमधला एक ‘कल्ट’ सिनेमा ठरेल. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डस केले व तो अनेक आठवडे चित्रपटगृहांत गर्दी खेचत होता. त्यावेळी घडलेला किस्सा प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी सांगितला होता. झालं होतं असं की रोहित शेट्टींचा, शाहरुख खान व दीपिका पदुकोण अभिनित, ‘चेन्नई एक्सप्रेस’ प्रदर्शित होण्याच्या मार्गावर होता. त्यांना अनेक चित्रपटगृहमालकांनी स्क्रीन देण्यासाठी नकार दिला. ते बुचकळ्यात पडले की शाहरुख च्या सिनेमाला नाही का म्हणताहेत? त्यांनी माहिती काढली तेव्हा असे कळले की बऱ्याच थिएटर्स मध्ये ‘दुनियादारी’ अनेक आठवडे ‘हाऊसफुल’ चे बोर्ड्स घेत होता. तर अशा या ‘दुनियादारी’ चित्रपटाचा दिग्दर्शक संजय जाधवने आता आपले अनुभव पुढच्या पिढीला उपयोगी पडतील हे जाणून त्यांच्या फायद्यासाठी एक चित्र-शाळा उभारली आहे. त्यांच्या ‘फिल्म मॅजिक फिल्म स्कूल’ चे नुकतेच उदघाटन झाले चमचमत्या सिताऱ्यांच्या सान्निध्यात.

फिल्म मॅजिक फिल्म स्कूलचे वैशिष्ठ्य आहे की, इथे प्रवेशासाठी कोणत्याही वयाची, शैक्षणिक पात्रतेची किंवा भाषेची बंधन नाहीत. संजय जाधव ह्यांचे गुरू आणि ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर ह्यांच्या हस्ते फिल्म मॅजिक फिल्म स्कूलचे उदघाटन झाले. ह्यावेळी संजय जाधव ह्यांना शुभेच्छा देताना सचिन पिळगावकर म्हणाले, “संजयची वाटचाल मी खूप अगोदरपासून पाहत आलोय. त्याने अतिशय मेहनतीनं आपलं करीयर घडवलंय. त्याचं नेतृत्व फिल्म मॅजिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचं करीयर घडवायला नक्कीच उपयोगी पडेल.”

Film Magic Film School was recently inaugurated
‘फिल्म मॅजिक फिल्म स्कूल’ चे नुकतेच उदघाटन झाले
फिल्म मॅजिकच्या स्थापनेविषयी संजय जाधव म्हणाले,”सिनेमाच्या मुख्य धारेत समाविष्ट होताना फिल्मसेटवर वापरली जाणारी भाषा, वावरायची पध्दत अशा अनेक गोष्टी नवोदिताला शिकाव्या लागतात. सिनेसृष्टीत पाऊल ठेवताना इथला माहौल पाहून अनेकांना भांबायला होतं. मी स्वानुभवाने शिकत गेलो. पण नव्या पिढीला आत्मविश्वासाने आपली वाटचाल करता यावी, म्हणून माझ्या आणि सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या तंत्रज्ञांच्या अनुभवाची शिदोरी आम्ही फिल्म मॅजिक मधून विद्यार्थ्यांना देऊ इच्छितो.” अभिनेत्री सई ताम्हणकर सर्वात आधी पोहोचली होती. तिचे व संजय जाधव यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि म्हणूनच सई, जवळपासच करीत असलेलं शूटिंग थोडा वेळ थांबवून, खास या कार्यक्रमाला हजेरी लावून गेली. ती म्हणाली, “महाराष्ट्रीयन फिल्ममेकरने अशा पध्दतीने एक फिल्म स्कूल सुरू करण्याचा विचार करावा ह्याचं मला कौतुक वाटतंय. आणि आता महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या विद्यार्थ्यांना संजयदादाच्या फिल्ममेकिंगच्या अनुभवाचा लाभ होईल, ह्याचा मला अभिमान आहे.”
Sanjay Jadhav
फिल्म मॅजिक फिल्म स्कूल’
सध्या ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेतून पुन्हा मराठी-प्रेक्षकप्रिय झालेली अभिनेत्री मानसी साळवी सुद्धा लवकरच पोहोचली होती. ती म्हणाली, “मी संजयसोबत आईशप्पथ फिल्म केली होती. तेव्हापासून मला त्याच्यातल्या गुरूचा अनुभव आलेला आहे. सिनेमासृष्टीत पाऊल ठेवताना त्याविषयीचं तंत्र माहिती असणे गरजेचे आहे. आणि मला असं वाटतं, ह्या फिल्म स्कूलचा युवापिढीला चांगलाच फायदा होईल.”‘दुनियादारी’ मधील एक हिरो अभिनेता अंकुश चौधरी न थकता माध्यमांशी बोलत होता. तो म्हणाला, “संजय जाधवसोबत माझं नातं आभाळमाया मालिकेपासूनचं आहे. तेव्हापासून आजपर्यंत मी त्याच्याकडून शिकतोच आहे. प्रत्येक मालिका, फिल्मगणिक मी खूप शिकत गेलो. जसं मला खूप शिकता आलं, ती संधी फिल्म मॅजिक मुळे इथल्या विद्यार्थ्यांना मिळेल, असं मला वाटतं.”अभिनेता सिध्दार्थ जाधव लवकरच पोहोचला होता व त्याच्या एनर्जीने आजूबाजूचे वातावरण ‘चार्ज्ड-अप’ केले होते. इकडून तिकडून बागडत असताना तो म्हणाला, “ फिल्म मॅजिकच्या निमित्ताने संजयदादाचा दृष्टिकोण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल. ह्याचा मला आनंद आहे. संजयदादाकडे सिनेसृष्टीतल्या कामाचा खूप अनुभव आहे. नव्या कलाकाराला संजयदादा नेहमीच व्यासपीठ मिळवून देतो. त्यामुळे फिल्ममॅजिक ही फिल्म स्कूल सुरू झाल्याचा खूप आनंद आहे.”संजय जाधव हा अभिनेत्री तेजस्विनी पंडित चा फेव्हरेट डिरेक्टर आहे. तेजस्विनीसुद्धा बऱ्यापैकी लवकर आली होती व सर्वांत मिसळत होती. ती म्हणाली, “जेव्हा आम्ही ह्या क्षेत्रात आलो, तेव्हा आम्हांला सिनेतंत्राविषयी माहिती करून देणा-या अशा कोणत्या इन्स्टिट्यूट नव्हत्या. आजकालच्या नवोदितांना फिल्म मॅजिक सारख्या फिल्म स्कूल मिळतायेत. तर ह्या संधीचा त्यांनी पूरेपूर फायदा घ्यावा असं मला वाटतं. आम्हांला जर संजयदादासारखे मेन्टॉर करीयरच्या सुरूवातीला मिळाले असते, तर आजपेक्षा निम्म्या कालावधीतच करीयरमध्ये यश संपादन करता आले असते.” संजय जाधव आणि अभिनेता स्वप्निल जोशी यांचे भावाभावाचे नाते आहे. दोघेही आपापल्या जीवनात घडणाऱ्या गोष्टी एकमेकांसोबत सामायिक करीत असतात. स्वप्नील म्हणाला, “संजय जितका चांगला, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आहे तितकाच चांगला शिक्षक आहे. मी त्याच्यासोबत खूप जास्त काम केलंय. त्यामुळे मी नक्कीच सांगू शकतो, की, त्याची शिकवण्याची कला फार कमाल आहे. तो तुमच्या मनात शिरून तुमच्याकडून परफॉर्मन्स काढून घेतो. त्यामूळे संजयने ही फिल्म स्कूल सुरू करणं खूप गरजेचं होतं. आणि त्याच्या फिल्म स्कूलला माझ्या शुभेच्छा.”अभिनेता उमेश कामतने संजय जाधव दिग्दर्शित ‘ये रे ये रे पैसा’ मधून बहारदार अभिनय केला होता. कार्यक्रमाच्या गर्दीत सर्वात जास्ती वेळा मास्क लावून फिरणारा तोच होता. उमेश ने सांगितले की, “मला वाटतं की, योग्य मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडून मिळणं खूप गरजेचं आहे. फिल्मटेक्निक शिकवण्यासाठी शिबीरं खूप होतात. पण संजयदादा सारख्या सिनेमातल्या ऑलराउंडरकडून फिल्मविषयीच्या वेगवेगळ्या माध्यमातलं शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्यामूळे त्याच्या फिल्म स्कूलला माझ्या खूप शुभेच्छा.”अभिनेत्री सोनाली खरे संजय जाधव च्या प्रत्येक सिनेमातून दर्शन देते. त्यांच्यामध्ये एक खास बॉण्ड आहे आणि संजय ने सोनालीचा नवरा, बॉलिवूड ऍक्टर बिजय आनंद ला मराठी चित्रपटात मोठा रोल दिला होता. सोनाली म्हणाली,”ज्या मुलांना फिल्मविषयी जिज्ञासा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी फिल्म मॅजिक उत्तम फिल्म स्कूल असणार आहे. आपण देश-विदेशातल्या फिल्म इंन्स्टिट्युटची नावं ऐकतो. पण आपल्या मराठी मुलांसाठी कोणाताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वास देणारी ही इन्स्टिट्यूट असेल, असं मला वाटतं.”अभिनेत्री श्रेया बुगडेला संजय जाधवची मानलेली बहीण आहे. तिनेदेखील कुशल बद्रीकेसोबत या कार्यक्रमाला हजेरी लावली व नंतर दोघेही त्यांच्या शोच्या शूटसाठी गेले. श्रेया ने संजय च्या नवीन उपक्रमाबद्दल सांगितले की, “ह्या फिल्म स्कूलमध्ये जी मुलं शिकायला येणार आहेत, त्यांचा मला खरं तर हेवा वाटतो. लेखन, संकलन, छायाचित्रण, अभिनय, संगीत, नृत्य, दिग्दर्शन ह्या सर्व चित्रपटनिर्मितीच्या अंगांचा इत्थ्यंभूत अभ्यास संजयदादाचा आहे. त्यामूळे त्याने फिल्मस्कूल सुरू केल्याचा मला आनंद आहे. आता ह्या इन्स्टिट्यूटमधून चांगले तंत्रज्ञ सिनेसृष्टीला मिळतील. असा मला विश्वास आहे.” सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, तेजस्विनी पंडित, अंकुश चौधरी, मानसी साळवी, उमेश कामत, सोनाली खरे, सिध्दार्थ जाधव, श्रेया बुगडे, संजय नार्वेकर ह्या सुपरस्टार्ससोबतच नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव, संगीतकार अमितराज आणि पंकज पडघन, फिल्ममेकर विजु माने, अभिजीत पानसे, केदार शिंदे अशा सेलिब्रिटींची मांदियाळी ‘फिल्म मॅजिक’ फिल्म स्कूलच्या उदघाटनाला आवर्जून उपस्थिती लावून गेले.

हेही वाचा - सरसेनापती हंबीररावमध्ये 'हा' अभिनेता साकारणार छत्रपती शिवाजी महाराज!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.