मुंबई - सलमान खानच्या घरी पुन्हा एकदा नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. त्याची बहीण अर्पिता खान आणि मेव्हणा आयुष शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. त्यांना पहिला आहिल नावाचा मुलगा आहे. आता अर्पिताने पुन्हा एकदा गुड न्युज दिली आहे. त्यामुळे सलमानच्या घरी आनंदाचे वातावरण आहे.
अर्पिता आणि आयुष शर्मा यांनी चार वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली. ते दोघेही लग्नाच्या अगोदर ६ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. त्यांचा पहिला मुलगा आहिल हा सलमानचा फार लाडका आहे. सलमान नेहमी त्याच्यासोबत खेळताना दिसतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अर्पिता आणि आयुष यांचा १८ नोव्हेंबर २०१४ मध्ये हैदराबादमध्ये विवाहसोहळा पार पडला. आयुषने काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 'लव्हयात्री' या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली होती.
- View this post on Instagram
Innocence ♥️ #thorwback#weddingtime#pheras#hyderabad#falaknumapalace#18thnov @aaysharma
">