मुंबई - 'सेक्रेड गेम्स'बाबत चाहत्यांची उत्सुकता बऱ्याच दिवसापासून शिगेला पोहोचली होती. नेटफ्लिक्सवर या सीरिजच्या पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दुसऱ्या भागासाठीही चाहते आतुर होते. अखेर १५ ऑगस्टला ही वेबसीरिज प्रदर्शित करण्यात आली. मात्र, या सीरिजला पहिल्याच दिवशी पायरसीचा फटका बसला आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी, सैफ अली खान, पंकज त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'सेक्रेड गेम्स २' हा प्रदर्शनाच्या दिवशीच ऑनलाईन लिक झाला आहे. आत्तापर्यंत बऱ्याच चित्रपटांनाही पायरसीचा फटका बसलेला आहे. त्यामुळे 'सेक्रेड गेम्स'ची लोकप्रियता पाहता ही सीरिजही ऑनलाईन लिक करण्यात आली आहे.
सेक्रेड गेम्स ट्विटरवर ट्रेण्ड -
'सेक्रेड गेम्स २' हा ट्विटरवरही सध्या ट्रेण्ड होत असलेला पाहायला मिळत आहे. '#SacredGames2' हा हॅशटॅग वापरून या वेबसीरिजवर बरेचसे मिम्सही तयार करण्यात आले आहेत.
१०० कोटीपेक्षा जास्त खर्च -
नेटफ्लिक्सने सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या भागासाठी १०० कोटीपेक्षा जास्त खर्च केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पायरसीचा फटका कमाईवर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.