मुंबई - अभिनेत्री सोनम कपूर आणि दुलकर सलमान यांची जोडी असलेला 'झोया फॅक्टर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरवर चाहत्यांच्या भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हा ट्रेलर पाहून सोनमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा- सूर अन् भावनांचा मिलाफ, राणू मंडल यांच्या आवाजातील पहिलं गाणं प्रदर्शित
या चित्रपटात 'झोया' म्हणजे सोनम कपूर ही भारतीय क्रिकेट संघासाठी 'लकी चार्म' असल्याचं दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सोनम आणि दुलकर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करत आहेत. दुलकर या चित्रपटात क्रिकेटरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
-
Just watched the trailer of 'The Zoya Factor'.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
All the best to my good friend @AnilKapoor’s daughter @sonamakapoor & @dulQuer for this movie. 🙂
">Just watched the trailer of 'The Zoya Factor'.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 11, 2019
All the best to my good friend @AnilKapoor’s daughter @sonamakapoor & @dulQuer for this movie. 🙂Just watched the trailer of 'The Zoya Factor'.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) September 11, 2019
All the best to my good friend @AnilKapoor’s daughter @sonamakapoor & @dulQuer for this movie. 🙂
हेही वाचा- मुंबईत बाप्पाच्या दर्शनासाठी कलाकारांची मांदियाळी
अभिनेता अंगद बेदी हा देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याचाही फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
हेही वाचा-सूर अन् भावनांचा मिलाफ, राणू मंडल यांच्या आवाजातील पहिलं गाणं प्रदर्शित
अनुजा चौव्हाण यांच्या 'द झोया फॅक्टर' या कादंबरीवर आधारितच हा चित्रपट आहे. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.