मुंबई - सध्या देशभर सुरू असलेल्या कोविडच्या दुसऱ्या लाटेने खळबळ माजली आहे. अनेक शहरामध्ये रुग्णालयात बेड, ऑक्सीजन, इंजेक्शन्सचा तुटवडा आहे. आपल्या देशात दोन लसी बनल्या असल्या तरी त्यांचाही तुटवडा आहे. १ मेपासून १८ वर्षावरील सर्वांना लस मिळणार अशी घोषणा झाली असली तरी ही लस मिळणे मुश्किल बनले आहे. अशा वेळी आरआरआर या चित्रपटाच्या टीमने जनतेला आवाहन केले आहे.
-
Team #RRR - #JrNTR, #RamCharan, #AjayDevgn, #AliaBhatt and director #SSRajamouli - record a message to fight #Covid19 pandemic. #RRRMovie pic.twitter.com/67V9DAa9Lv
— taran adarsh (@taran_adarsh) May 6, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Team #RRR - #JrNTR, #RamCharan, #AjayDevgn, #AliaBhatt and director #SSRajamouli - record a message to fight #Covid19 pandemic. #RRRMovie pic.twitter.com/67V9DAa9Lv
— taran adarsh (@taran_adarsh) May 6, 2021Team #RRR - #JrNTR, #RamCharan, #AjayDevgn, #AliaBhatt and director #SSRajamouli - record a message to fight #Covid19 pandemic. #RRRMovie pic.twitter.com/67V9DAa9Lv
— taran adarsh (@taran_adarsh) May 6, 2021
आरआरआर हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पण सध्या सुरू असलेल्या कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर याचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्यात आलंय. या चित्रपटातून आलिया भट्ट दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. आरआरआर चित्रपटाच्या वतीने एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून यात आलिया तेलुगु भाषेतून आवाहन करताना दिसते. तर बॉलिवूड स्टार अजय देवगण हिंदीतून आवाहन करतान दिसत आहे.
आरआरआर चित्रपटाच्या टीमने केलेले आवाहन नेहमीचेच कोरोनापासून लांब राहण्यासाठी ज्या उपाय योजना केल्या जातात त्याची अंमलबजावणी करण्याचे आहे. या व्हिडिओमध्ये ज्यू. एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट्ट आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी कोविड विरुध्दच्या लढाईचे आवाहन केले आहे.
''लसीच्या बाबतीत पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. स्वतःही घ्या, नातेवाईक आणि इतरांनाही कोविड प्रतिबंधक लस घ्यायला सांगा. वचन द्या की मास्क परिधान करु आणि लस घेऊ.'', असे अजय देवगणने आपल्या आवाहनामध्ये म्हटले आहे.
हेही वाचा -'बाप माणूस' मालिकेतील अभिनेत्री अभिलाषा पाटीलचे कोरोनामुळे निधन