वॉशिंग्टन - लियोनार्डो डिकॅप्रियो आणि केट विंसलेट यांचा 'टायटॅनिक' हा चित्रपट आजही तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. यामधील रोझ आणि जॅक यांची प्रेमकथा तसेच यातील टायटॅनिक दृश्याचीही क्रेझ पाहायला मिळते. मात्र, चित्रपटाच्या शेवटी रोझला वाचवण्यासाठी जॅक आपल्या जीवाची बाजी लावतो. रोझ त्याला वाचवू शकली असती का? हा प्रश्न नक्कीच प्रेक्षकांना पडतो. या प्रश्नाचं उत्तर टायटॅनिक थिम असलेलं 'माय हार्ट विल गो ऑन' या गाण्याची गायिका सेलिन डियोनने दिलं आहे.
हेही वाचा -IFFI 2019 : करण जोहर करणार 'ईफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्याचं सुत्रसंचालन
कॅनेडियन गायिका असलेली सेलिन हिला एका कार्यक्रमात याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने आपलं मत व्यक्त केलं.
'सर्वात आधी तर आपण चित्रपटात पाहिलं की, 'रोझ ज्यावर बसलेली असते, तिची परिस्थिती अगोदरच खराब असते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, स्वत:चा प्राण वाचवण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नसते. चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरॉन यांनाही हा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला. मात्र, हा काही चर्चेचा विषय नाही', असे सेलिन यावेळी म्हणाली.
हेही वाचा -'मिर्झापूर २' लवकरच येणार, पंकज त्रिपाठींनी दिली हिंट
डिकॅप्रियो आणि केट यांची मुख्य भूमिका असलेला टायटॅनिक १९९७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट सूपरहिट ठरला होता.