मुंबई - बॉलिवूडची क्युट जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुजा यांची ओळख आहे. चाहत्यांमध्येही त्यांची मोठी लोकप्रियता आहे. दोघांच्याही फोटो आणि व्हिडिओला चाहत्यांचे लाखो व्हिव्ज मिळतात. अशातच जेनेलिया आणि रितेश दोघांनीही त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांचाही क्युट अंदाज पाहायला मिळतो.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या व्हिडिओमध्ये रितेश जेनेलियाला टाय बांधुन देताना दिसतो. तर, जेनेलियाच्या चेहऱ्यावर अतिशय क्युट हावभाव पाहायला मिळतात. जेनेलियाने हा व्हिडिओ शेअर करून त्यावर खास कॅप्शनही दिले आहे. त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ११ लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - डॉ. सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, रितेशने यावर्षी 'मरजावां' आणि 'हाऊसफुल ४' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्याचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले आहेत. आता तो 'बागी ३'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तो टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत दिसणार आहे.
हेही वाचा - ओळखा पाहू! कोणतं रूप आहे रिंकुचं शंभर नंबरी 'मेकअप'