ETV Bharat / sitara

पाहा, 'मेकअप' टीझर : पुन्हा एकदा 'याड' लावायला रिंकू राजगुरू सज्ज - Rinku Rajgurus latest news

रिंकू राजगुरुची भूमिका असलेला ''मेकअप'' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित झालाय. रिंकुच्या तोंडी खणखणीत डॉयलॉग यात पाहायला मिळतात.

Rinku Rajguru
रिंकु राजगुरू
author img

By

Published : Dec 10, 2019, 5:57 PM IST

Updated : Dec 10, 2019, 6:54 PM IST

मुंबई - 'सैराट'फेम अभिनेत्री रिंकू राजगुरुचा नवा चित्रपट ''मेकअप'' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. पुन्हा एकदा बिनधास्त भूमिकेत ती झळकणार आहे. या चित्रपटाचा नवा टीझर प्रदर्शित झालाय. रिंकुच्या तोंडी खणखणीत डॉयलॉग यात पाहायला मिळतात.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

एक सर्वसाधारण मुलगी अशी ओळख असणाऱ्या एका बिनधास्त मुलीची ही गोष्ट आहे. टीझरच्या सुरुवातीला तिची ओळख करून दिली जाते या शब्दात, "१०० टक्के संस्कारी, १०० टक्के लाजरी-बुजरी, पण हा तर आहे तिचा १०० टक्के मेकअप." यावरून तिचे वरवरून दिसणारे रुप वेगळे आहे याचा अंदाज येऊन जातो.

रिंकूची यात दोन भिन्न रूपे पाहायला मिळत आहेत. या चित्रपटातही रिंकूचा बिनधास्त अंदाज दिसत असून तिचा हा 'मेकअप' कशासाठी आहे, यासाठी मात्र थोडी वाट पाहावी लागणार आहे. रिंकू आणि चिन्मय उदगीरकरच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक फ्रेश जोडी पाहायला मिळेल. चित्रपटाचे लेखन गणेश पंडित यांनी केले असून वेगवगेळे विषय हाताळण्यात, काहीतरी नाविन्यपूर्ण देण्यात गणेश पंडित यांचा हातखंडा आहे. त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की.

रिंकुच्या तोंडी एक जबरदस्त टाळ्या शिट्ट्यांचा डायलॉग आहे. ती म्हणते, "हर देवदास की गर्लफ्रेंड कभी पारू नही होती और ६ परसेंट अल्कोहोलवाली बियर कभी दारू नही होती.''

आपल्या अनोख्या लेखनाने, अभिनयकौशल्याने गणेश पंडित यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा नावलौकिक कमावल्यानंतर आता गणेश पंडित एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट, बाला इंडस्ट्रीज अँड एंटरटेनमेंट प्रा. लि., शेमारू एंटरटेनमेंट लि. निर्मित आणि ग्रीन पल मीडिया प्रस्तुत 'मेकअप' या चित्रपटातून गणेश पंडित यांनी आपले पाऊल दिग्दर्शनाकडे वळवले आहे. काही महिन्यांपूर्वी 'मेकअप' या चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित झाला होता. त्याची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता या चित्रपटाचा दुसरा टिझर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून या धमाल टीझरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

दीपक मुकूट, बी. बालाजी राव, हिरेन गाडा, नीरज कुमार बर्मन, अमित सिंग निर्मीत आणि केतन मारू, कलीम खान सहनिर्मित या चित्रपटात रिंकू राजगुरू हिची प्रमुख भूमिका असून टीझरमध्ये चिन्मय उदगीरकरही दिसत आहे. ७ फेब्रुवारी २०२० रोजी ''मेकअप'' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Dec 10, 2019, 6:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.