ETV Bharat / sitara

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या रिलीजची प्रतीक्षा संपली, ‘या’ तारखेला येणार भेटीला!

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

सरसेनापती हंबीरराव
सरसेनापती हंबीरराव
author img

By

Published : Mar 19, 2022, 5:23 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक शिलेदारांबद्दल बऱ्याच प्रेक्षकांना माहिती नाहीये वा कमी माहिती आहे. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांमधून शिवकालीन कहाण्या हाताळण्यात आल्या आणि त्यांना प्रेक्षकांची पसंतीसुद्धा मिळाली. जगभरातील शिवप्रेमी एका आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

या चित्रपटात मराठीतील ‘हँडसम हंक’ अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाचा रक्त उसळवणारा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला जगभरातील प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील संवाद आणि जबरदस्त ऍक्शन सिक्वेन्समुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत उत्कंठा वाढली होती. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बिगबजेट चित्रपट असून मे महिन्याच्या सुट्टीत दमदार संवाद, जबरदस्त ऍक्शनची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

संदीप मोहिते पाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेला ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या २७ मे २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

हेही वाचा - अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे'चा बॉक्स ऑफिसवर दणका, पहिल्याच दिवशी केली १३ कोटींची कमाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.