मुंबई - डॉ. विक्रम साराभाई व डॉ. होमी जे. भाभा यांच्या जीवनावर आधारित ‘रॉकेट बॉईज’ ही सिरीज भारताचे भविष्य रचताना इतिहास घडवलेल्या दोन पुरूषांच्या असाधारण कथांना दाखवते. ईश्वक सिंगने डॉ. विक्रम साराभाई यांची भूमिका साकारली आहे, तर जिम सर्भने डॉ. होमी जे. भाभा यांची भूमिका साकारली आहे. रेजिना कॅसॅण्ड्राने साराभाई यांची पत्नी व दिग्गज नर्तिका मृणालिनी साराभाई यांची भूमिका साकारली आहे. ती 'रॉकेट बॉईज' मधून हिंदी ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. रेजिना दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करते आणि तिथे ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नवीन विषय आणि हाताळणी
रेजिना म्हणाली, ''मला सर्वोत्तम सह-कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्यच आहे. ईश्वक व जिमसोबत असताना कधीच कंटाळवाणे वाटले नाही. आम्ही नेहमीच सेटवर खूप धमाल केली. असे असले तरी ईश्वक व जिम उत्तम कलाकार देखील आहेत. त्यांनी नेहमीच माझ्या अभिनयावर बारकाईने नजर ठेवली.'' ''माझ्या सीन्सचे शूटिंग झाल्यानंतर मी डिनर टेबलवर ईश्वकला नोट्स बनवताना पाहिले. त्याने मला पाहताच वही बंद केली. यामुळे माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. नंतर मला समजले की, तो प्रत्येक संवादाच्या नोट्स बनवतो. त्याने त्याच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पाहून माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की, मी पुरेशी कामगिरी करत आहे ना? तो त्याच्या भूमिकांसाठी करत असलेले प्रयत्न व मांडत असलेले विचार पाहून खूपच चांगले वाटले.''
रॉकेट बॉईज वेगळी सिरीज
''माझ्या करिअरच्या सुरूवातीपासून काम करण्याची माझी एक पद्धत आहे. मला लिहिलेले संवाद सहाय्यक वाटतात. लिहिलेले संवाद वाचताना खूप आनंद मिळतो. मी भूमिका व त्यांच्या संवादांबाबत अभ्यास करतो. त्यामुळे मी भूमिकेला अधिक उत्तमरित्या जाणून घेऊ शकतो आणि यामुळे मला भूमिकेमध्ये समरस होण्यास मदत होते. तसेच मला सीन्सदरम्यान पॉज घेण्यास देखील मदत होते आणि ते लक्षात राहण्यास मदत होते.'' निखिल अडवाणी, रॉय कपूर फिल्म्स अँड एम्मी एंटरटेन्मेंट निर्मित 'रॉकेट बॉईज'चे दिग्दर्शन अभय पन्नू यांनी केले आहे. सिद्धार्थ रॉय कपूर, मोनिषा अडवानी, मधू भोजवानी व निखिल अडवाणी हे निर्माते आहेत. ८ भागांची ही सिरीज सुरू होत आहे ४ फेब्रुवारीपासून सोनीलिव्हवर पाहण्यास मिळेल.
हेही वाचा - Bollywood Actress Kajol :बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण