मुंबई - आज भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेटमध्ये अशीच उंची गाठली असली तरी त्याचा पाया ७० आणि ८० च्या दशकात रोवला गेला होता. या दशकानंतर, विविध अंगांनी सुधारणा होत आज अभेद्य असा संघ म्हणून भारतीय क्रिकेट संघाकडे पाहिले जाते. या संघाच्या उत्क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारा क्रिकेटपटू म्हणजे कपिल देव. १९८३ चे विश्वविजेतेपद मिळवून दिल्यानंतर संघात आत्मविश्वास जागृत करून देणाऱ्या कपिल देव यांनी आज ६१ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यांच्या वाढदिवसा निमित्त अभिनेता रणवीर सिंग याने त्यांच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
१९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. या सामन्यात कपिल देव यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती. याच विश्वचषक सामन्याचा थरार '८३' या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक कबीर सिंग हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर, रणवीर हा कपिल देव यांच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रणवीरचा कपिल देव यांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला आहे. हुबेहुब कपिल देव यांच्यासारखाच रणवीरचा लूक या चित्रपटात पाहता येणार आहे. रणवीरने चित्रपटातील भूमिकेसाठी कपिल देव यांच्यासोबत राहून क्रिकेटचे धडे घेतले आहेत. तसेच, त्यांच्या व्यक्तीमत्वाचे बारीक निरीक्षणही त्याने करत आपल्या भूमिकेत या गोष्टी साकारल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा -#HBDKapilDev : क्रिकेटच्या कारकिर्दीत कधीही 'रनआऊट' न झालेला क्रिकेटपटू
रणवीरने कपिल देव यांच्यासोबतचे फोटो शेअर करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रणवीरसोबत इतरही बरेच कलाकार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. त्यामुळे '८३'च्या विश्वचषकाचा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.
हेही वाचा -B'Day Spl: ए. आर. रेहमान यांच्याविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?