मुंबई - रेल्वेस्टेशन ते सिनेसृष्टी असा प्रवास करणाऱ्या राणू मंडल हे नाव आता सर्वांनाच चांगलच परिचीत झालं आहे. एका व्हायरल व्हिडिओनं त्यांचं पूर्ण आयुष्यच बदलवून टाकलं. हिमेश रेशमियाच्या आगामी 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या चित्रपटात त्यांना गाणं गाण्यासाठी मोठा ब्रेक मिळाला. त्यामुळे त्या आणखी प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यांच्याबद्दल लता मंगेशकर यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या प्रतिक्रियेवर राणू यांनी त्यांचं पहिलं गाणं प्रदर्शित झाल्यानंतर उत्तर दिलं आहे.
-
Himesh sir and #RanuMondal singing the epic blockbuster song #TeriMeriKahani live at the launch event. #HappyHardyAndHeer pic.twitter.com/CbFKvpsVOQ
— Team Himesh (@TeamHimesh) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Himesh sir and #RanuMondal singing the epic blockbuster song #TeriMeriKahani live at the launch event. #HappyHardyAndHeer pic.twitter.com/CbFKvpsVOQ
— Team Himesh (@TeamHimesh) September 12, 2019Himesh sir and #RanuMondal singing the epic blockbuster song #TeriMeriKahani live at the launch event. #HappyHardyAndHeer pic.twitter.com/CbFKvpsVOQ
— Team Himesh (@TeamHimesh) September 12, 2019
लता दिदींचं 'एक प्यार का नगमा' हे गाणं गाऊनच राणू प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. रातोरात त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या आवाजाची भूरळ सर्वांनाच पडली. हिमेश रेशमियानेही त्यांच्या आवाजाने मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर त्यांच्या आवाजाला थेट लता मंगेशकर यांच्या आवाजाचीही उपमा देण्यात येत होती. याबाबत लतादिदींनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते, की 'मी गायलेल्या गाण्यांनी कोणाचं भलं होत असेल, तर मला आनंदच आहे. मात्र, कुठलीही आणि कुणाचीही नक्कल ही जास्त काळ टिकणारी नसते. म्हणून स्वतःचं वैशिष्ट्य शोधावं'.
त्यांच्या याच प्रतिक्रियेवर राणू यांनी उत्तर देताना म्हटलंय, की 'मी नक्कीच स्वत:ची शैली निर्माण करेल. प्रत्येकजण कोणाकडुन तरी प्रेरणा घेत असतं. मी तुमच्याकडुन प्रेरणा घेतली आहे'.
-
Himesh sir and #RanuMondal's song #TeriMeriKahani from #HappyHardyAndHeer has become the num 1 track globally beating senorita pic.twitter.com/MihpMmA04c
— Team Himesh (@TeamHimesh) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Himesh sir and #RanuMondal's song #TeriMeriKahani from #HappyHardyAndHeer has become the num 1 track globally beating senorita pic.twitter.com/MihpMmA04c
— Team Himesh (@TeamHimesh) September 12, 2019Himesh sir and #RanuMondal's song #TeriMeriKahani from #HappyHardyAndHeer has become the num 1 track globally beating senorita pic.twitter.com/MihpMmA04c
— Team Himesh (@TeamHimesh) September 12, 2019
हेही वाचा -सोनमच्या 'झोया फॅक्टर'साठी 'मास्टर ब्लास्टर'च्या शुभेच्छा, ट्विट व्हायरल
हिमेश रेशमिया यानेही याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, की 'राणू या जन्मजात एक महान गायिका आहेत. त्यांच्यामध्ये भरभरुन टॅलेंट लपलेलं आहे. तिच कला आता बाहेर येत आहे. प्रत्येकजण लता मंगेशकर यांच्यासारखं असू शकत नाही. मात्र, त्या नेहमी सर्वांसाठी प्रेरणा आहेत'.
राणू या लहानपणापासूनच लतादिदींचे गाणे गात आल्या आहेत. त्यांना लतादिदिंचे गाणे आवडतात. त्यांचा आवाज लतादिदींच्या आवाजाशी मिळता जुळता असल्यामुळे त्या स्वत:ला भाग्यशाली समजतात.
हेही वाचा -सारागढीच्या युद्धाची १२२ वर्ष, अक्षयनं शेअर केली पोस्ट
अलिकडेच हिमेश रेशमियाच्या 'हॅप्पी, हार्डी अँड हिर' या चित्रपटातील राणू मंडल आणि हिमेश रेशमियाच्या आवाजातील 'तेरी मेरी कहाणी' या गाण्याचा लॉन्चिंग इव्हेंट पार पडला. यावेळी राणू यांचे वेगळे रुप पाहायला मिळाले. शिवाय त्यांनी माध्यमांच्या प्रश्नांनाही आत्मविश्वासाने उत्तरं दिली. हिमेश रेशमियाचेही त्यांनी आभार मानले. यावेळी हिमेश रेशमिया देखील राणू यांचा प्रवास सांगताना भावुक झाला होता.
-
#TeriMeriKahani launch event #HimeshReshammiya #RanuMondal pic.twitter.com/vMykYn3DhC
— Team Himesh (@TeamHimesh) September 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeriMeriKahani launch event #HimeshReshammiya #RanuMondal pic.twitter.com/vMykYn3DhC
— Team Himesh (@TeamHimesh) September 11, 2019#TeriMeriKahani launch event #HimeshReshammiya #RanuMondal pic.twitter.com/vMykYn3DhC
— Team Himesh (@TeamHimesh) September 11, 2019
हेही वाचा -ईशान-अनन्याच्या 'खाली पिली'च्या चित्रीकरणाला सुरुवात, 'या' दिवशी होणार प्रदर्शित