मुंबई - बॉलिवूडचा 'हँडसम हंक' रणबीर कपूरचा आज ३७ वा वाढदिवस आहे. २८ सप्टेंबर १९८२ साली त्याचा जन्म झाला होता. बालपणापासूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या रणबीरचा फिल्मी प्रवासही रंजक आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाची जबरदस्त छाप तरुणाईवर पाहायला मिळते. आज तो अनेकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...
रणबीरला पहिला ब्रेक हा संजय लिला भन्साळी यांच्या 'सावरियां' चित्रपटात मिळाला होता. यामध्ये त्याच्यासोबत सोनम कपूर झळकली होती. मात्र, त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. एकापाठोपाठ एक अशा बऱ्याच फ्लॉप चित्रपटांचा त्याला सामना करावा लागला. यामध्ये 'बेशरम', 'रॉय' आणि 'बॉम्बे वेल्वेट' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यानंतर त्याला बऱ्याच टीकांनाही सामोरे जावे लागले. मात्र, रणवीरनं मोठ्या जिद्दीनं आणि आपल्या अभिनयानं पुन्हा दमदार चित्रपटांची निवड केली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पुढे त्याने 'वेक अप सिड', 'अजब प्रेम की गजब कहानी', 'रॉकेट सिंग - सेल्समॅन ऑफ द ईयर', यांसारख्या चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर २०१० साली प्रदर्शित झालेल्या 'राजनीती' चित्रपटानंतरही त्याच्या लोकप्रियतेत भर पडली. पुढे त्याला बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये स्थान मिळाले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रणबीरने 'रॉकस्टार', 'बर्फी', 'तमाशा', 'ए दिल है मुश्किल', 'ये जवानी है दिवानी', 'अनजाना - अनजानी', यांसारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. त्याने संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित 'संजू' चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारली होती. या भूमिकेचीही मोठी प्रशंसा झाली. या चित्रपटासाठी त्याला पुरस्कारही मिळाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तो वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. त्याचे दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ यांच्याबरोबरचे अफेअर्स फार गाजले. आता त्याच्या आणि आलिया भट्ट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु आहेत. दोघांची ऑनस्क्रिन जोडी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">