हैदराबाद - अभिनेता राणा दग्गुबाटी आज एका सिरेख कार्यक्रमात मिहीका बजाजसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. आपल्या चाहत्यांसाठी त्याने पारंपरिक पोशाखातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
राणाने शेअर केलेल्या फोटोत तो लग्नासाठी तयारीत असताना वडील सुरेश बाबू आणि काका व्यंकटेश यांच्यासमवेत पोज देताना दिसत आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये "रेडी !! " असे लिहिले आह.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या सर्व पाहुण्यांच्या सुरक्षिततेचे सर्व उपाय करण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार असून सॅनिटायझर्सशिवाय जैव-सुरक्षित वातावरण तयार केले जाणार आहे. मोजक्या आमंत्रितांसोबत हा विवाह सोहळा पार पडेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - केरळ विमान दुर्घटना : बॉलिवूड स्टार्सनी दु:ख व्यक्त करीत वाहिली श्रद्धांजली
बुधवारी ज्युबिली हिल्समधील मिहेकाच्या घरी हळदीचा कार्यक्रम पार पडला. पारंपरिक वातावरणात पार पडलेल्या या समारंभात अत्यंत उत्साहाने वधूचे लाड पुरवण्यात आले. मिहेकाच्या स्टायलिस्टने शेअर केलेल्या फोटोमध्ये वधू तेजस्वी दिसत असून आयुष्याचा नवा अध्या प्ररंभ करण्यासाठी उत्सुक आणि आनंदी दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मुंबईतील ड्यू ड्रॉप डिझाईन स्टुडिओची संस्थापक असलेल्या मिहेकाने तिच्या इंस्टाग्रामवर लग्नापूर्वीच्या उत्सवातील काही जबरदस्त आकर्षक फोटोही शेअर केले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यावर्षी मे महिन्यात राणाने मिहेकासोबतचे विवाह करीत असल्याचे इन्स्टाग्रामवर लिहिले होते. तेव्हा पासून त्याचे चाहते या विवाह सोळ्याची प्रतीक्षा करीत होती. अखेर तो क्षण आज आला असून राणा आणि मिहिकांचा सहजीवन प्रवास आजपासून सुरू होईल.