ETV Bharat / sitara

दक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये ‘थलायवा’ रजनीकांतच सर्वाधिक लोकप्रिय !!

author img

By

Published : Jun 10, 2019, 6:39 PM IST

नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टच्या अनुसार, गेल्या सहा महिन्यांमध्ये रजनीकांतची लोकप्रिता पाहता, तेच ‘थलायवा’ असल्याचीच गोष्ट पून्हा एकदा अधोरेखीत झालीय.

रजनीकांतच सर्वाधिक लोकप्रिय

रजनीकांतची लोकप्रियता त्यांच्या चाहत्यांमध्ये एवढी आहे की, त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने ‘थलायवा’ असं म्हणतात. आणि नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टच्या अनुसार, गेल्या सहा महिन्यांमध्ये रजनीकांतची लोकप्रिता पाहता, तेच ‘थलायवा’ असल्याचीच गोष्ट पून्हा एकदा अधोरेखीत झालीय.

रजनीकांतच्या 2018-2019 मध्ये तीन फिल्म्स रिलीज झाल्या. काला, 2.0 आणि पेटा ह्या तीन चित्रपटांमूळे वेबसाइट, ई पेपर आणि वायरल न्यूजमध्ये 5447 अंकांसह रजनीकांत बाकी दक्षिणात्य अभिनेत्यांहून अग्रेसर असल्याचेच समोर आले आहे. आणि गेल्या सहा महिन्यांमधल्या रँकिंगनूसार, तर 100 पैकी 100 गुणांसह रजनीकांत लोकप्रियतेत अग्रणी असल्याचेच समोर आले आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन ह्या लोकप्रियतेच्या चार्टमध्ये 4223 गुणांसह दूस-या स्थानी आहे. 100 मधून 77.53 गुण मिळवून आपल्या चाहत्या वर्गाच्या प्रेमामूळे स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर पृथ्वीराज दूस-या क्रमांकावर आहे.

3829 गुणांसह बाहुबली फेम प्रभास लोकप्रियतेत तिस-या क्रमांकावर आहे. बाहुबलीनंतर प्रभासची लोकप्रियता दक्षिणमध्येच नाही तर बॉलीवूडमध्येही वाढलीय. त्यामूळेच 100 मधून 70.30 गुणांसह प्रभास तिस-या पदावर आहे.

आपल्या महर्षी चित्रपटामूळे 3489 गुणांसह महेशबाबू चौथ्या स्थानी आहे. तर 2018 मध्ये रिलीज झालेली महेश बाबूची ‘भारत अने नेनू’ टॉप ग्रॉसर फिल्म असल्यामूळेही त्याच्या लोकप्रियतेत वाढ झालेली आहे. महर्षीमूळे तर जगभरात महेशबाबूच्या फॅनफॉलोविंग चांगलीच वाढ झालीय. म्हणूनच 64.05 गुणांसह महेश बाबू चौथ्या स्थानी आहे.

सुपरस्टार मोहनलालच्या ‘लुसिफर’ आणि ‘ओडियन’ ह्या दोन फिल्म्सनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. म्हणूनच स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर 3294 गुणांसह मोहनलाल पांचव्या स्थानी आहेत. मोहनलाल यांच्या चाहतावर्गामूळे 100 पैकी 60.47 गुण मिळवून ते लोकप्रियतेत पाचव्या पदावर आहेत.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “प्रभास आणि महेश बाबू ह्या दोघांची प्रचंड फॅनफॉलोविंग आहे. सोशल प्लेटफॉर्म, न्यूज़पेपर आणि वायरल न्यूज़ रैंकिंग मध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. पण थलायवा रजनीकांत आणि सुपरस्टार मोहनलाल ह्यांची अनेक वर्षांची लोकप्रियता असल्याने त्यांना लोकप्रियतेत मागे टाकणेच अनेक स्टार्सना सहज शक्य नाही. पृथ्वीराजची सुध्दा मासेस आणि क्लासेसमध्ये चांगलीच लोकप्रियता आहे. “

अश्वनी कौल पूढे सांगतात, "आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

Intro:Body:

Entertainment

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.