ETV Bharat / sitara

'ढाई किलो'चा हात काँग्रेसच्या 'हाता'वर भारी पडणार - अशोक पंडित - Congress

भाजप तर्फे सनी देओलने निवणूकीचा फॉर्म भरला...त्याचा ढाई किलोचा हात काँग्रेसच्या हातावर भारी पडणार...असे मत निर्माता अशोक पंडित यांनी मांडलंय....

अशोक पंडित यांनी दिला सनी देओलला पाठिंबा
author img

By

Published : Apr 30, 2019, 5:12 PM IST

मुंबई - पंजाबमधील गुरुदासपूरमधून भाजप तर्फे सनी देओल यांनी निवडणूकीचा फॉर्म भरला आहे. त्याचा ढाई किलो का हात काँग्रेसच्या हातावर भारी पडणार अशी यामुळे चर्चा सुरू झाली आहे. निर्माता अशोक पंडित यांनी ट्विट करुन याचा उल्लेख केला आहे.

लोकसभा निवडणूकीत बॉलिवूडकरांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. काहीजण निवडणूकीच्या मैदानात थेट उतरले आहेत, तर काहींनी आपले समर्थन दिलंय. भाजप समर्थक कलाकारांनी एकत्र येऊन पुन्हा एकदा मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मोहिम सुरू केली. दुसरीकडे भाजप विरोधी ६०० कलाकारांनी एकत्र येत मोदींना सत्तेपासून दूर करण्याचे आवाहन केले.

या पार्श्वभूमीवर सनी देओल यांनी गुरुदासपूरमधून भाजप तर्फे फॉर्म भरला. त्याने रोड शो करीत शक्ती प्रदर्शनदेखील केले. त्याचा लहान भाऊ बॉबी देओल सावलीसारखा त्याच्यासोबत आहे. अनेक सेलेब्रिटी त्याच्या प्रचारासाठी येतील अशी अटकळ बांधली जातेय. त्याचे समर्थन अनेक जण करीत आहे. अशोक पंडित यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेत आहे.

त्यांनी लिहिलंय, ''या निवडणूकीत नरेंद्र मोदी यांची सरशी होणार. ६०० सुमार बॉलिवूड सेलेब्रिटीजना टक्कर देण्यासाठी एकट्या सनी देओलचा ढाई किलोचा हात काँग्रेसचा हात मोडण्यास पुरेसा आहे.''

Intro:Body:

Ent News 02

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.