मुंबई - अभिनेता प्रतीक बब्बर आणि त्याची पत्नी सान्या सागर यांच्यातील नाते बिघडल्याची सध्या चर्चा आहे. त्याच्या नात्यात बिनसल्याचे सूत्रांकडून समजते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक आणि सान्या गेल्या दोन आठवड्यांपासून विभक्त राहत आहेत. त्यांनी केवळ इंस्टाग्रामवरच एकमेकांना फॉलो केले नाही तर एकमेकांच्या फोटोंनाही त्यांच्या संबंधित हँडलवरून हटवले आहे.
बब्बर फॅमिली फंक्शनला सान्या उपस्थित राहिली नव्हती. इतकेच नाही तर तिने विल्यम शेक्सपिअरच्या ज्यूलियट सिझर या तिच्या नाटकालाही तिने प्रतिकला आमंत्रित केले नव्हते. या नाटकात ती पोर्टिया ही भूमिका साकारत होती. असे असले तरी या दोघांनी सर्व प्रकारच्या बातम्यांचे खंडन केले आहे. आपल्यात सर्व काही अलबेल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मागील वर्षी जानेवारीत एका खासगी सोहळ्यात या जोडप्याने लग्नगाठ बांधली होती. पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीच्या लग्न सोहळ्यात सानिया आणि प्रतिक यांनी विवाह केला होता.
वर्क फ्रंटवर प्रतिक 'मुंबई सागा'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफ, जॉन अब्राहम, सुनील शेट्टी, इमरान हाश्मी, पंकज त्रिपाठी, गुलशन ग्रोव्हर, शरमन जोशी यांच्यासह इतरांच्याही प्रमुख भूमिका आहेत.