ETV Bharat / sitara

'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

author img

By

Published : May 16, 2021, 3:32 PM IST

महाराष्ट्रातील जनता सध्या लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेली असली तरी निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक व सह निर्माते हर्षवर्धन भरत गायकवाड, स्वाती खोपकर, निनाद बट्टीन आणि तबरेज पटेल यांनी 'लॉकडाऊन लग्न' चित्रपटाची घोषणा केली होती. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केले आहे.

'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

मुंबई - सध्या सुरू असलेल्या जागतिक कोरोना संकटातही काहीजण नवीन कल्पना राबवताना दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता सध्या लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेली असली तरी निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक व सह निर्माते हर्षवर्धन भरत गायकवाड, स्वाती खोपकर, निनाद बट्टीन आणि तबरेज पटेल यांनी 'लॉकडाऊन लग्न' चित्रपटाची घोषणा केली होती. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमधील हा आगळावेगळा विषय हाताळण्याचे धाडस दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी केले आहे.

'लॉकडाऊन लग्न'
'लॉकडाऊन लग्न'
अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून पोस्टरमध्ये मास्क हा अंतरपाट म्हणून धरण्यात आला आहे आणि त्यावर आमंत्रण पत्रिकाही छापली आहे. तर ओवाळणीच्या ताटासोबत सॅनिटायझर, ऑक्सिमीटर ठेवण्यात आले आहे. लंडनच्या लॉकडाऊनमध्ये आयुष्यभराचे क्वारंटाइन असा आगळावेगळा विषय घेऊन चित्रपट येणार आहे. त्यामुळे एकूणच नेमके या चित्रपटात काय घडणार, वा कथानकाचे स्वरुप काय असणार? याकडे सिनेप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.निर्माते किरण कुमावत, अमोल लक्ष्मण कागणे, गौरी सागर पाठक यांच्या डॉक्टर डॉक्टर चित्रपटाच्या यशानंतर ते पुन्हा एकदा नव्या कोऱ्या आणि दमदार विषयाच्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित संघमित्रा करत असून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तिच्यासह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाची मजेदार कथा सुमीत संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. तर या चित्रपटाचे डिओपी योगेश कोळी आहेत. याशिवाय या लग्नकथेला खरा साज चढवलाय तो 'लॉकडाऊन लग्न' या चित्रपटातील गाण्यांनी. या चित्रपटाच्या संगीताची धुरा अभिजित कवठळकर यांनी पेलवली आहे.

हेही वाचा -सोनू सूदचे लोकांच्या मदतीसाठी 'पुढचे पाऊल'!!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.