ETV Bharat / sitara

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज, अमृता खानविलकरच्या हस्ते झाले अनावरण - ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

मराठी निर्मात्यांना स्वतःचे हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून अक्षय बर्दापूरकर यांनी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ ची स्थापना केली आहे. याच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे अनावरण प्रख्यात अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या हस्ते करण्यात आले.

author img

By

Published : Jul 1, 2021, 7:05 PM IST

कोरोना काळात चित्रपटगृहांवर संकट आलं परंतु ओटीटी प्लॅटफॉर्म्सची चालती सुरु झाली. आधीच वेब सीरिजसाठी तरुण प्रेक्षक डिजिटल माध्यमाकडे वळला होता आणि त्यावर नवीन चित्रपटसुद्धा प्रदर्शित होऊ लागल्याने या माध्यमाला सुगीचे दिवस आले. साहजिकच या माध्यमासाठी खास भव्यदिव्य मोठ्या बजेट्सचे नवीन कन्टेन्ट बानू लागले. त्याचबरोबर नवीन ओटीटी प्लॅटफॉर्म्सही जन्म घेऊ लागले. त्यातील एक म्हणजे प्लॅनेट मराठी.

या चॅनेलची खासियत म्हणजे प्लॅनेट मराठी हा फक्त मराठी कन्टेन्टला स्वतःचे व्यासपीठ देणारा प्लॅटफॉर्म आहे. मराठी चित्रपट वा वेब सिरीज ना प्रस्थापित ओटीटी प्लॅटफॉर्म्स सापत्न वागणं देत होते म्हणून मराठी निर्मात्यांना स्वतःचे हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून अक्षय बर्दापूरकर यांनी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ ची स्थापना केली. याच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे अनावरण प्रख्यात अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्या हस्ते करण्यात आले.

मागील अनेक महिन्यांपासून प्रेक्षक ज्या 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची इतक्या आतुरतेने वाट पाहात होते, ते पहिलंवहिलं मराठी ओटीटी चॅनेल अखेर त्यांच्या भेटीला आलं आहे. त्यामुळे आपल्या मराठमोळ्या प्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली असून आपल्या या हक्काच्या ओटीटीवर जगभरात कुठेही बसून मराठी चित्रपट, वेबसिरीज, विविध कार्यक्रम, सोहळे पाहता येणार आहेत. सध्या जरी प्रेक्षकांसाठी प्लॅनेट मराठी ओटीटी अंतर्गत 'प्लॅनेट मराठी सिनेमा'वर 'जून' हा एक्सक्लुझिव्ह चित्रपट (पे पर व्ह्यू) उपलब्ध असला तरी 'प्लॅनेट मराठी ओरिजनल'ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या लाँचबद्दल अमृता खानविलकर म्हणाली, ''मला विशेष आनंद आहे की, या 'प्लॅनेट मराठी ओटीटी' परिवाराशी मी 'प्लॅनेट टॅलेंट'च्या माध्यमातून जोडले गेले आहे. आतापर्यंत 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ने आपल्या अनेक आगामी वेबसिरीज, वेबफिल्म्सची घोषणा केली आहे. एवढ्या मोठया मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचे अनावरण माझ्या हस्ते झाले, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचा कंटेन्ट पाहता 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.''

'प्लॅनेट मराठी ओटीटी' चे प्रमुख आणि संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ''आम्हाला अत्यंत आनंद होतोय की, आज अखेर 'प्लॅनेट मराठी' प्रेक्षकांच्या भेटीला आले. अनेक महिन्यांपासून प्रेक्षक 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची वाट पाहत होते. तसेच लवकरच प्रेक्षक आपला आवडता कंटेन्ट 'प्लॅनेट मराठी' वर पाहू शकतील. या व्यतिरिक्त मराठी भाषेला लाभलेला समृद्ध साहित्य वारसा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आणि प्रेक्षकांशी असलेली बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने आमचा कायमच प्रयत्न असेल. प्रेक्षकांना दर्जेदार, आशयपूर्ण कंटेन्ट पाहायला मिळेल, याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ.’

'प्लॅनेट मराठी ओटीटी', 'अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनी' अखेर प्रेक्षकांच्या भेटीस आली असून सिनेसृष्टीवर आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची जादू करणाऱ्या अमृता खानविलकर हिच्या हस्ते 'प्लॅनेट मराठी ओटीटी'चे अधिकृत अनावरण करण्यात आले. याचा उदघाटन सोहळा, कोविड प्रोटोकॉल्स मुळे, साधेपणाने पार पडला.

हेही वाचा -करिश्मा कपूरची बॉलिवूडमध्ये ३० वर्षे, शेअर केला हिट गाण्यांचा फ्लॅशबॅक व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.