ETV Bharat / sitara

'मिर्झापूर २' लवकरच येणार, पंकज त्रिपाठींनी दिली हिंट - news about mirzapur web series

पंकज यांनी इन्स्टाग्रामवरही पदार्पण केलं आहे. 'हम बनाएंगे इंस्टाग्राम को मिर्जापूर', असे कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

'मिर्झापूर २' लवकरच येणार, पंकज त्रिपांठीनी दिली हिंट
author img

By

Published : Nov 16, 2019, 10:31 PM IST

मुंबई - अभिनेता पंकज त्रिपाठीची लोकप्रिय वेबसीरिज मिर्जापूरचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २०१८ मध्ये या वेबसीरिजचा पहिला भाग पाहायला मिळाला होता. ही वेबसीरिज प्रचंड गाजली होती. आता या सीरिजचा दुसरा भागही आता तयार होणार असल्याचं बोललं जात आहे.

पंकज त्रिपाठी यांनी याबाबत सोशल मीडियावरुन एक हिंटही दिली आहे. एक टीझर शेअर करुन त्यांनी मिर्झापूर सीरिजला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

पंकज यांनी इन्स्टाग्रामवरही पदार्पण केलं आहे. 'हम बनाएंगे इंस्टाग्राम को मिर्जापूर', असे कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा -IFFI 2019 : करण जोहर करणार 'ईफ्फी'च्या उद्घाटन सोहळ्याचं सुत्रसंचालन

या वेबसीरिजमध्ये पंकज यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. आता दुसऱ्या भागातही त्यांना विलनच्याच रुपात पाहण्याची शक्यता आहे.

सीरिजच्या पहिल्या भागात पुरेपूर अ‌ॅक्शन दाखवण्यात आली आहे. यामध्ये अली फजल, दिव्येंदू, विक्रांत मेस्सी, कुलभूषण खरबंदा, रसिका दुग्गल, श्रिया पिळगावंकर आणि श्वेता त्रिपाठी यांच्यादेखील भूमिका होत्या. त्यामुळे दुसऱ्या भागाविषयीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

हेही वाचा -प्रतिभावंत कलाकार 'व्ही. शांताराम', ज्येष्ठ समीक्षक दिलीप ठाकूरांनी सांगितल्या आठवणी

मागच्या वर्षी १६ नोव्हेंबरलाच ही सीरिज प्रदर्शित झाली होती. आता दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार, याची माहीतीही लवकरच देण्यात येणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.