मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा लवकरच हंसल मेहता दिग्दर्शित 'छलांग' चित्रपटात दिसणार आहे. हंसल मेहतासोबत काम करण्याच्या तिच्या अनुभवाविषयी बोलताना नुसरत म्हणाली, "मी नेहमीच त्यांची प्रशंसक आहे. मला त्यांच्या कथा खूप स्फूर्तिदायक, वेगळ्या आणि वास्तववादी वाटल्या. त्या आपल्यात एक उत्कटता निर्माण करतात आणि तुम्हाला कृती करायला भाग पाडतात. आपण पुढाकार कसा घ्यायचा, आपल्याला कोणता पर्याय स्वीकारायचा आहे किंवा आपले विचार कसे असावेत याबद्दलची जाणीव निर्माण करतात."
अभिनेत्री नुसरत पुढे म्हणाली, "त्याच्याबरोबर काम करण्याचा मला नेहमीच इच्छा होती. मला संधी मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे. हा एक हलका फुलका विनोदी चित्रपट आहे, पण शेवटी एक संदेश देतो. या चित्रपटाचा एक भाग होण्याचा मला नक्कीच आनंद आहे आणि धन्य वाटते. "
'छलांग'मध्ये नुसरत आपल्या हरियाणवी भाषेत बोलणारी एक साधी उत्तर भारतीय मुलगी दाखवली आहे. चित्रपटातील राजकुमार राव याच्याबरोबरच्या तिच्या ऑन स्क्रिन केमिस्ट्रीचेही कौतुक होत आहे.
'छलांग' व्यतिरिक्त नुसरत लवकरच 'हुडदंग'मध्ये सनी कौशल आणि विजय वर्मा यांच्यासोबत दिसणार आहे.