ETV Bharat / sitara

#PuneethRajkumar : पुनीत राजकुमारनेही केले नेत्रदान, जपला आई वडिलांचा अनोखा वारसा - a unique legacy of parents

1994 पासून राजाजीनगर येथील डॉ. राजकुमार नेत्रपेढीने 14,901 डोळे गोळा केले आहेत. शुक्रवारी, वडील डॉ. राजकुमार आणि आई पर्वतम्मा यांच्यानंतर अभिनेता पुनीत राजकुमार नेत्रदान करणारा त्याच्या कुटुंबातील तिसरा सदस्य बनला आहे.

#PuneethRajkumar
#PuneethRajkumar
author img

By

Published : Oct 30, 2021, 8:15 PM IST

Updated : Oct 30, 2021, 8:42 PM IST

बंगळूरू - डॉ. राजकुमार यांच्या नावाने शहरातील राजाजी नगरमध्ये नेत्रपिढी चालवण्यात येते. आतापर्यंत या नेत्रपेढीत 14,901 डोळे दान झाले आहेत. डॉ. राजकुमार यांनीही याच नेत्रपेढीसाठी आपले डोळे दान केले होते. त्यानंतर पुनीत यांच्या आई पर्वतम्मा यांच्या निधननानंतर त्यांनीही नेत्रदान केले होते. आता पुनीत राजकुमारनेही नेत्रदान करीत आई वडिलांचा हा अनोखा वारसा जपला आहे. अभिनेता पुनीत राजकुमार नेत्रदान करणारा त्याच्या कुटुंबातील तिसरा सदस्य बनला आहे.

  • While I was at hospital to see Appu Sir, a medical group came to remove his eyes in 6-hour window after death

    Appu Sir—like Dr Rajkumar & @NimmaShivanna—donated his eyes

    Following in their footsteps & in Appu Sir’s memory, we must all pledge to donate our #eyes as well

    I do so pic.twitter.com/MsNAv5zGZC

    — Chetan Kumar Ahimsa / ಚೇತನ್ ಅಹಿಂಸಾ (@ChetanAhimsa) October 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुनीत राजकुमार यांचे निधन झाल्याचे घोषीत झाल्यानंतर त्यांचे डोळे काढण्यासाठी वैद्यकीय पथक रुग्णालयात दाखल झाले होते. निधनानंतर सहा तासाच्या आत हे डोळे काढावे लागतात. नेत्रदान केल्यानंतरच त्याचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नेण्यात आले होते. ही माहिती पुनीतच्या एका चाहत्याने ट्विटरवर दिली आहे.

वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालेले लोकप्रिय कन्नड अभिनेता पुनीत राजकुमार यांचे अंत्यसंस्कार 31 ऑक्टोबर रोजी कांतीरवा स्टेडियमवर होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावांशी चर्चा करून तारीख निश्चित केली. दरम्यान, दिवंगत अभिनेत्याची मुलगी दिल्लीहून बेंगळुरूला पोहोचली आहे.

कोणतीही अप्रिय परिस्थिती हाताळण्यासाठी राजधानी बेंगळुरूसह संपूर्ण राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कन्नड चित्रपट उद्योग ठप्प झाला आहे आणि सर्व चित्रपटांचे शो बंद करण्यात आले आहेत. पुनीतच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्या तीन चाहत्यांचा बळी गेला आहे.

पुनीत हे कन्नड सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते डॉ. राजकुमार यांचे पाचवे आणि सर्वात लहान मुलगा होते. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यायामशाळेत व्यायाम करत असताना 46 वर्षीय पनीतला हृदयविकाराचा झटका आला, त्याला तातडीने विक्रम रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीने उपचार केले मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही.

हेही वाचा - #PuneethRajkumar : उद्या अंत्यसंस्कार, कांतिर्वा स्टेडियममध्ये अंत्यदर्शन, धक्क्याने दोन चाहत्यांचा मृत्यू, दोन गंभीर

Last Updated : Oct 30, 2021, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.