ETV Bharat / sitara

#PuneethRajkumar : अंत्यदर्शनासाठी नागरिकांसह सेलेब्रिटींची रीघ, शहरावर शोककळा - पुनीत राजपूतचे निधन

कन्नड पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर उद्या कांतीरवा स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. उद्या किती वाजता अंत्यसंस्कार होणार हे आज संध्याकाळी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलंय. शनिवारी, सीएम बोम्मई, प्रभू देवा आणि राज्यपाल गेहलोत यांच्यासह मान्यवरांनी दिवंगत अभिनेत्याला आदरांजली वाहिली.

अंत्यदर्शनासाठी नागरिकांसह सेलेब्रिटींची रीघ

author img

By

Published : Oct 30, 2021, 3:51 PM IST

कन्नड पॉवर स्टार पुनीत राजकुमार यांच्या पार्थिवावर उद्या कांतीरवा स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. उद्या किती वाजता अंत्यसंस्कार होणार हे आज संध्याकाळी जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलंय. शनिवारी, सीएम बोम्मई, प्रभू देवा आणि राज्यपाल गेहलोत यांच्यासह मान्यवरांनी दिवंगत अभिनेत्याला आदरांजली वाहिली. “अप्पू”, “वीरा कन्नडिगा” आणि “मौर्य” यांसारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या 46 वर्षीय अभिनेत्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुग्णालयात निधन झाले होते. फिटनेस उत्साही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुनीतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर छातीत दुखू लागल्यानंतर त्याला विक्रम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

पुनीत राजकुमारच्या मृत्यनंतर सँडलवूडसह दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला. तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी पुनीत राजकुमारला श्रध्दांजली वाहिली. अनेकांनी सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली आहे. तर अनेक तंत्रज्ञ, लेखक, कलाकार, दिग्दर्शक अंत्यदर्शन घेत आहे.

नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक प्रभू देवा यांनी आज दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांना बेंगळुरू येथील कांतीरवा स्टेडियममध्ये अखेरची श्रद्धांजली वाहिली. ''हा एक अतिशय दुःखाचा दिवस आहे. या नुकसानीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत'', असे तो म्हणतो.

बॉलिवूड स्टार अनिल कपूर, सुनिल शेट्टी यांनीही सोशल मीडियावरुन श्रध्दांजली वाहिली आहे.सुनिल शेट्टी यांनी लिहिलंय, ''पुनीत राजकुमारच्या जाण्याने धक्का बसला. मी कल्पनाही करू शकत नाही की फक्त 46 माझा प्रिय मित्र #PuneethRajkumar आता नाही. माझा सुपरस्टार मित्र आणि एक अद्भुत माणूस खूप लवकर गेला. देव तुमच्या कुटुंबीयांना, मित्रांना आणि चाहत्यांना शक्ती देवो.''

बिग बी अमिताभ यांनीही आजचा दिवस अंधारला असल्याचे म्हटलंय. खूप जवळचा व्यक्ती हरवल्याचे अमिताभ यांनी लिहिलंय. डॉ. राजकुमार यांच्या भेटीला अमिताभ गेले असताना पुनीत राजकुमारसोबत बच्चन यांचा स्नेह जमला होता.

दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांनीही दुःख व्यक्त केलंय. त्यांनी लिहिलंय, ''पुनीत राजकुमारच्या जाण्याने मोठा धक्का बसला आहे. मला अजूनही या बातम्यांवर विश्वास ठेवणे कठीण वाटते. मी लहान भाऊ गमावल्यासारखे वाटते. माझे विचार आणि प्रार्थना त्यांच्या कुटुंबासाठी आहेत ज्यांच्याशी माझे जवळचे नाते आहे. या नुकसानाचा सामना करण्यासाठी मी त्यांना शक्ती आणि सांत्वन देतो.''

दरम्यान डॉ. राजकुमार यांचे मूळ गाव असलेल्या चामराजनगर येथील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी पुनीत राज यांच्या स्मरणार्थ स्वेच्छेने बंद पाळला आहे. पुनीत या जिल्ह्याचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम करीत होते.

हेही वाचा - #Puneeth Rajkumar : उद्या अंत्यसंस्कार, कांतिर्वा स्टेडियममध्ये अंत्यदर्शन, धक्क्याने दोन चाहत्यांचा मृत्यू, दोन गंभीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.