ETV Bharat / sitara

ऋषी कपूर ने नीतू सिंग ला ‘असे’ केले होते प्रपोज! - ऋषी कपूर

नीतू कपूर ने इंडियन आयडॉल १२ च्या कार्यक्रमात हजेरी लावली जो ऋषी कपूरच्या आठवणींना सेलिब्रेट करतोय. या दरम्यान ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी सादर केली जातील. यावेळी ऋषी कपूरने नितू यांना कसे प्रपोज केले ते सांगितले.

nitu kapoor, nitu kapoor letest news, rishi kapoor
नितू कपूर
author img

By

Published : Mar 28, 2021, 12:31 PM IST

मुंबई - गेल्या वर्षी बॉलिवूडचे चॉकलेट हिरो ऋषी कपूर यांचे निधन झाले. हा त्यांची पत्नी नीतू कपूर आणि कपूर खानदानावर मोठा आघात होता. परंतु तिचे सासरे राज कपूर म्हणायचे ‘शो मस्ट गो ऑन’ त्याप्रमाणे नीतू कपूर ने इंडियन आयडॉल १२ च्या कार्यक्रमात हजेरी लावली जो ऋषी कपूरच्या आठवणींना सेलिब्रेट करतोय. या दरम्यान ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी सादर केली जातील.

दानिश आणि नचिकेत यांनी 'बचना ए हसींनो' आणि 'छुकर मेरे मन को' या गाण्यांचे रंगमंचावर उत्तम सादरीकरण केले. नीतू कपूरने त्यांची स्तुती केली व ऋषी कपूर बद्दल बोलताना म्हणाली, ‘मी ऋषी कपूरची ‘विंग वूमन’ होते. म्हणजे त्याला मुलींना इंप्रेस करायचे असायचे आणि मी त्या मुलींना त्याच्याविषयी छान छान गोष्टी सांगत त्याला मदत करायचे. मात्र आम्ही ‘डेटिंग’ करायला लागलो तेव्हा साहजिकच ते थांबलं. ऋषी कपूर ला नीतू नेहमीच ‘क्युट’ वाटायची (असे तोच तिला नेहमी सांगायचा) आणि ते दोघे घट्ट मित्र होते म्हणून एकमेकांना ‘बॉब’ या टोपण नावाने हाक मारायचे.’

दानिशच्या परफॉर्मन्समध्ये तिला ऋषी कपूरची झलक दिसली. नीतू म्हणाली की ‘तू अगदी मनस्वीपणे सादरीकरण केलंस, जसं ऋषी करायचा. तुझ्यात ऋषीची झलकही दिसतेय.’ पुढच्या सांगीतिक परफॉर्मन्स नंतर नीतू कपूरने ऋषी ने तिला कसे प्रोपोज केले याचा किस्सा सांगितला. ‘मी काश्मिर मध्ये शूटिंग करत होते आणि ऋषी पॅरिस मध्ये. आम्ही चांगले मित्र होतो म्हणून एकमेकांची खबरबात असायची परंतु आजच्या प्रमाणे मोबाईल वगैरे नसल्याने मुबईतच भेटगाठ व्हायची. एक दिवस शूटिंग करत असताना मला निरोप मिळाला की मला एक टेलिग्राम आला आहे. त्या काळी टेलिग्राम म्हटलं की काहीतरी वाईट बातमी असणार असंच वाटायचे. मी टेलिग्राम वाचला आणि आनंदित झाले. तो टेलिग्राम ऋषी कपूर ने पॅरिस वरून पाठविला होता ज्यात लिहिले होते की तो मला खूप मिस करतोय आणि त्याचे माझ्यावर प्रेम आहे.’

इंडियन आयडल १२ प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर रात्री ९.३० वाजता प्रसारीत होतो.

हेही वाचा - टी-सिरीजच्या चित्रपटांना फिल्मफेअरची तब्बल ५५पेक्षा जास्त नामांकने

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.