ETV Bharat / sitara

निशिकांत कामत यांची प्रकृती "स्थिर पण गंभीर" - दिग्दर्शक निशिकांत कामत रुग्णालयात दाखल

दृष्यम या गाजलेल्या हिंदी चित्रपटाचे आणि डोंबिवली फास्टसारख्या प्रख्यांत मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामत यांना हैदराबादमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याना गंभीर यकृताचा आजार आणि इतर दुय्यम संसर्गांचे निदान झाले आहे. त्यांची प्रकृती "स्थिर पण गंभीर" आहे.

Nishikant Kamat
निशिकांत कामत
author img

By

Published : Aug 13, 2020, 1:16 PM IST

हैदराबाद - दृश्यम आणि मदारी या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक निशिकांत कामत यांना यकृताच्या उपचारांसाठी इथल्या एआयजी हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाने बुधवारी दिली. निवेदनात वैद्यकीय सुविधाही जोडली गेली आहे. त्यांची प्रकृती "स्थिर पण गंभीर" आहे.

५० वर्षीय कामत यांना ३१ जुलै रोजी गचीबोवली येथील खासगी रुग्णालयात "कावीळ आणि ओटीपोटात हानी झाल्याने" उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

निशिकांत कामत हे "दुय्यम संसर्ग" ग्रस्त आहेत आणि सध्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

"त्याना गंभीर यकृत आजार आणि इतर दुय्यम संसर्गांचे निदान झाले आहे. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपेटालॉजिस्ट आणि इतर ज्येष्ठ सल्लागारांच्या मल्टीस्पेशालिस्ट डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली अति दक्षता विभागात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे पण गंभीर, " असे रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा - दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक, हैदराबादमधील रुग्णालयात उपचार

कामत यांनी २००५ मध्ये डोंबिवली फास्ट या मराठी चित्रपटाद्वारे दिग्दर्शिनात पदार्पण केले. २००८ च्या 'मुंबई मेरी जान' या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात इरफान आणि आर माधवन यांनी अभिनय केला होता.

२०१६ मध्ये जॉन अब्राहम-अभिनीत रॉकी हॅन्डसममध्येही निशिकांत कामत यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती, ज्याचे त्याने दिग्दर्शनही त्यांनी केले होते.

त्यांचा सर्वात मोठा हिट चित्रपट अजय देवगण-तब्बू स्टारर 'दृष्यम' होता, जो याच नावाच्या मल्याळम चित्रपटाचा रिमेक होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.