मुंबई - बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या वर्षात तिने बरीच सुपरहिट गाणी बॉलिवूडला दिली आहेत. सध्या ती इंडियन आयडॉलच्या अकराव्या पर्वाच्या परीक्षकाच्या भूमिकेत आहे. या कार्यक्रमात दर आठवड्याला वेगवेगळ्या थिमनुसार गाणी सादर केली जातात. सध्या या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये नेहा तिच्या एक्स बॉयफ्रेंडसाठी गाणं गाताना दिसून येते.
कॉमेडी क्विन भारती आणि तिचा पती हर्ष यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात 'शादी स्पेशल' भाग प्रसारित होणार आहे. भारती आणि हर्षच्याही लग्नाला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या विनोदांनी सेटवर हास्यकल्लोळ निर्माण केला होता.
हेही वाचा -अक्षयने दिलेले 'ते' अमुल्य झूमके घालून ट्विंकलने शेअर केला फोटो
त्यांच्यासमोर या कार्यक्रमातील स्पर्धकांनी गाणी सादर केली. यावेळी एका स्पर्धकाने 'ऐ दिल है मुश्किल' मधील 'चन्ना मेरेया' हे गाणं गायलं. तेव्हा नेहा कक्कर थोडी भावुक झाली होती. तिला देखील हे गाणं गाण्याचा मोह आवरला नाही. हे गाणं आपल्या एक्स बॉयफ्रेंडसाठी गात असल्याचं सांगत तिने या गाण्याचं एक कडवं गायलं. हे गाणं गाताना ती खुपच भावुक झाली होती.
-
Entertainment aur suroon ka quota hoga high kyunki aa rahi hai @bharti_lalli aur unke dulhe #HaarshLimbachiyaa iss weekend #ShaadiSpecial mein. Miss mat kijiye #IndianIdol11 iss Sat raat 8 baje. #IndianIdol #EkDeshEkAwaaz @iAmNehaKakkar @VishalDadlani #HimeshReshammiya pic.twitter.com/AxHlDc0Qno
— Sony TV (@SonyTV) December 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Entertainment aur suroon ka quota hoga high kyunki aa rahi hai @bharti_lalli aur unke dulhe #HaarshLimbachiyaa iss weekend #ShaadiSpecial mein. Miss mat kijiye #IndianIdol11 iss Sat raat 8 baje. #IndianIdol #EkDeshEkAwaaz @iAmNehaKakkar @VishalDadlani #HimeshReshammiya pic.twitter.com/AxHlDc0Qno
— Sony TV (@SonyTV) December 19, 2019Entertainment aur suroon ka quota hoga high kyunki aa rahi hai @bharti_lalli aur unke dulhe #HaarshLimbachiyaa iss weekend #ShaadiSpecial mein. Miss mat kijiye #IndianIdol11 iss Sat raat 8 baje. #IndianIdol #EkDeshEkAwaaz @iAmNehaKakkar @VishalDadlani #HimeshReshammiya pic.twitter.com/AxHlDc0Qno
— Sony TV (@SonyTV) December 19, 2019
काही महिन्यांपूर्वी नेहा आणि अभिनेता हिमांश कोहली हे एकमेकांच्या प्रेमात असल्याचे बोलले जात होते. इंडियन आयडॉलच्या दहाव्या पर्वात हिमांशने नेहाला सेटवर प्रपोज केले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे ब्रेकअप झाले. नेहाने हे गाणे हिमांशसाठीच गायले असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत.
हेही वाचा -'सौदा खरा खरा' गाण्यामागची धमाल मस्ती, अक्षय कुमारने शेअर केला मेकिंग व्हिडिओ