मुंबई - 'बधाई हो' चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आलेल्या नीना गुप्ता इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ बोस्टनमध्ये २ पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. त्यांच्या 'द लास्ट कलर' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
नीना गुप्ता यांच्या 'द लास्ट कलर' या चित्रपटाची 'सर्वोत्कृष्ट फिचर' या श्रेणीमध्ये निवड झाली होती. नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन याबद्दल माहिती दिली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा-बॉलिवूडच्या 'या' खतरनाक व्हिलनच्या मुलगा करणार बॉलिवूड डेब्यू, पाहा फोटो
या चित्रपटाचं दिग्दर्शन विकास खन्ना यांनी केलं होतं. या चित्रपटाची कथा वृंदावन आणि वारानसी येथील विधवा महिलांवर आधारित होती.
या चित्रपटाचा पहिला लूक 'कान्स फिल्म फेस्टिव्हल', 'न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हल' आणि 'इंडी मेमे फिल्म फेस्टिव्हल'मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
नीना गुप्ता यांनी 'बधाई हो' चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत भूमिका साकारली होती. 'बधाई हो' चित्रपटालाही पुरस्कार मिळाला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा-प्रियांका चोप्रापूर्वी वयाने मोठ्या असलेल्या 'या' अभिनेत्रींना डेट करत होता निक जोनास