ETV Bharat / sitara

अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटात 'बधाई हो'च्या या अभिनेत्रीची एन्ट्री, साकारणार 'ही' भूमिका - sooryavanshi

रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सिम्बा' चित्रपटातूनच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.

अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चित्रपटात 'बधाई हो'च्या या अभिनेत्रीची एन्ट्री, साकारणार 'ही' भूमिका
author img

By

Published : May 6, 2019, 12:16 PM IST

मुंबई - रोहित शेट्टीचे दिग्दर्शन असलेल्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 'सिम्बा' चित्रपटातूनच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाच्या पोस्टरपासून तर अक्षयच्या लूक्सपर्यंत सोशल मीडियामध्ये क्रेझ पाहायला मिळते. अलिकडेच अक्षय सोबत या चित्रपटात कॅटरिना कैफ झळकणार असल्याचेही समोर आले आहे. त्यासोबतच 'बधाई हो' चित्रपटातील नीना गुप्ते यांचीही एन्ट्री होणार आहे.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, 'सूर्यवंशी' चित्रपटात नीनी गुप्ते अक्षय कुमारच्या आईची भूमिका साकारणार आहेत. 'बधाई हो' चित्रपटात त्यांनी आयुष्मान खुरानाच्या आईची भूमिका साकारली होती.

Neena Gupta
नीना गुप्ता

'रोहित शेट्टीच्या चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मी फार उत्साही आहे. आता जास्तीत जास्त प्रेक्षक माझे काम पाहू शकतील', असे नीना गुप्ता यांनी म्हटले आहे.
'सूर्यवंशी' चित्रपटात अक्षय कुमार पुन्हा एकदा पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. कॅटरिना त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे पहिले शूटिंग शेड्यूल मुंबईत पूर्ण होणार आहे. तर, दुसरे बँकॉक येथे होईल. त्यानंतर रामोजी फिल्म सीटी आणि गोव्यातही या चित्रपटाचे शूटिंग होणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.