ETV Bharat / sitara

धर्म, भोंगा आणि अझान यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा'

author img

By

Published : Jul 19, 2021, 3:19 AM IST

अझानवर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘भोंगा’ येत्या २४ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

mh_mum_ent_national_award_winner_bhonga_azaan_MHC10001

आपलं ते खरं करण्याची मानवी वृत्ती अशा या समस्यांना दुजोराच असल्याने बऱ्याचदा काही अनपेक्षित घटना डोळ्यसमोर घडताना दिसतात. असाच आशयघन विषय या 'भोंगा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' या चित्रपटाने चित्रपट प्रदर्शनापूर्वीच चांगलीच प्रसिद्धी मिळविली. हल्लीच चित्रपटाच्या पोस्टरने सोशल मीडियावर प्रेक्षकांचेही लक्ष वेधून घेतले. याच्या टीझरमध्ये भोंग्याचा आणि धर्माचा काही संबंध असतो का, तसेच त्याचे परिणाम अझान वर होऊ शकतात का अशाप्रकारची आशयघन कथा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' चित्रपटातून हाताळण्यात आली आहे.

'भोंगा' चित्रपटाची कथा ही अझान वर भाष्य करणारी आहे. या कुटुंबातील नऊ महिन्याच्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. या आजाराला उच्च ध्वनीचा त्रास अधिक होतो. अझानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर सतत परिणाम होऊन बाळाचा त्रास वाढतच जातो, बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव पाहतो, आणि हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न गावकऱ्यांकडून आणि बाळाच्या घरातल्यांकडून केले जातात अथवा चित्रपटात नेमके काय घडते याची थोडीशी कल्पना आलीच असेल.

national award winner bhonga azam movie release on 24 september
भोंगा चित्रपटाचे पोस्टर
ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर या चित्रपटात जोर दिला असून या पार्श्वभूमीवर हा 'भोंगा' चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीस आला असून टिझर मध्ये दाखवल्याप्रमाणे धर्मापेक्षा मोठं कोणी नाही मग कोणाच्या जीवाला धोका असला तरी चालेल या वृत्तीला दडपून टाकण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न दाखवण्यात आले आहेत. नुकतेच प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढून राहिली आहे.
भोंगा चित्रपटाची कथा आणि संवाद शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे लिखित असून चित्रपटातील गाणी विजय गटलेवार यांची असून गाण्याचे बोल सुबोध पवार लिखित आहेत. चित्रपटाचे संकलन निलेश गावंड यांनी केले असून या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी रामनी रंजन दास आणि वीरधवल पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिप्ती धोत्रे आणि अभिनेता कपिल गडसुरकर, अमोल कागणे, श्रीपाद जोशी, आकाश घरत, दिलीप डोंबे, सुधाकर बिराजदार, अरुण गीते, महेंद्र तिसगे, रमेश भोळे, दिपाली कुलकर्णी या कलाकारांचे अभिनय पाहायला मिळणार आहेत.
भोंगा चित्रपटाची निर्मिती निर्माते, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, अर्जुन हिरामन महाजन, अमोल लक्ष्मण कागणे यांनी केली असून या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी सांभाळली असून 'अमोल कागणे फिल्म्स' हा चित्रपट प्रस्तुत करीत आहेत. अझानवर भाष्य करणारा हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘भोंगा’ येत्या २४ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.