सैराट चित्रपटाने भारतात इतिहास रचला. मराठमोळ्या कलाकृतीला दोशभर लोकप्रियता मिळण्याची अलिकडची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. बॉक्स ऑफिसवर १०० कोटी कमवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. अनेक विक्रम या चित्रपटाच्या नावार आहे. याला आता ३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
सैराट चित्रपटाचे मेकिंग हादेखील मोठ्या उत्सुकतेचा विषय होता. सैराटच्या नावानं चांगभलं हा शोदेखील टीव्हीवर पार पडला. यात मेकिंगच्या काही रंजक गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. आता या शोचे यूट्यूबवरुन प्रसारण होणार आहे.
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फेसबुकवरुन याची घोषणा केली आहे. त्यांनी लिहिलंय, " 'सैराट' रिलीज होऊन तीन वर्षे झाली. दिवस खूप वेगात निघून जातात.प्रत्येक वर्तमान क्षण भूतकाळ होत जातोय नि आठवणीत जमा होतोय. 'सैराट'साठी सगळ्याच टीमनं घेतलेले कष्ट केलेले उपद्व्याप ह्याच्या खूप आठवणी आहेत. ह्या पडद्यामागच्या कथेची डॉक्युमेंटरी
"सैराटच्या नावानं चांगभलं" च्या रूपानं जतन करून ठेवावी म्हणून केली. गार्गीनं ती दिग्दर्शित केली. कुतुब इनामदार,वैभव दाभाडे,वसीम मुल्ला यांनी ती एडिट केली.अमित भोकसे, भूषण मंजुळे, ललित खाचने व सर्व आटपाट टीमने खूप मोलाची भर घातली .
" उद्या महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधून "सैराटच्या नावानं चांगभलं" (पहिला एपिसोड/ सहा भाग) आटपाटच्या युट्युब चॅनलवर उपलब्ध होत आहे याचा आनंद वाटतोय.( उद्या सकाळी 8 वाजता ) वेळ मिळाला तर नक्की बघा. 😊
सदिच्छा !!"