ETV Bharat / sitara

नागा चैतन्यने सामंथा रुथ प्रभूसोबतच्या घटस्फोटावर सोडले मौन - दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य

दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने आता अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूसोबत घटस्फोटावर आपले मौन सोडले आहे. एका मुलाखतीत नागाने पहिल्यांदाच घटस्फोटाबाबत खुलासा केला आहे.

नागा चैतन्य सामंथा रुथ प्रभू
नागा चैतन्य सामंथा रुथ प्रभू
author img

By

Published : Jan 13, 2022, 4:48 PM IST

हैदराबाद : अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर दक्षिण अभिनेता नागा चैतन्यने यावर मौन सोडले आहे. या जोडप्याने 2021 मध्ये त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. या जोडप्याच्या घटस्फोटाची अनेक कारणे समोर आली आहेत. दोघांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने दोघांच्या चाहत्यांना धक्का बसला होता. आता नागा चैतन्य सामंथासोबतच्या घटस्फोटावर उघडपणे बोलला आहे.

नागा चैतन्य सामंथा रुथ प्रभू
नागा चैतन्य सामंथा रुथ प्रभू

आजकाल नागा त्याच्या 'बंगाराजू' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे आणि अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान त्याने आपल्या घटस्फोटाबद्दलचा खुलासा केला आहे. नागा चैतन्य म्हणाला, ''वेगळं होणं ठीक आहे, दोघांनाही स्वतःच्या आनंदासाठी ते योग्य होते, जर ती आनंदी असेल तर मीही आनंदी आहे. अशा परिस्थितीत विभक्त होण्याचा निर्णय योग्य होता.''

यापूर्वी सामंथा रुथ प्रभूनेही घटस्फोटावर ETimes ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, ''मला वाटते मी यावर अनेकदा बोलले आहे. याबद्दल बोलणे आवश्यक होते आणि मी बोललेही. परंतु आता मला वाटत नाही यावर पुन्हा पुन्हा बोलावे.'

गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी या जोडप्याने आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून त्यांच्या विभक्त झाल्याची माहिती दिली होती. विशेष म्हणजे या जोडप्याने 29 जानेवारी 2017 रोजी हैदराबादमध्ये एंगेजमेंट केली होती. 6 ऑक्टोबर 2017 रोजी गोव्यात शाही विवाह पार पडला होता. दोघांचे लग्न केवळ 4 वर्षे टिकले.

सामंथाबद्दल बोलायचे झाले तर घटस्फोटानंतर ती वेगळे आयुष्य जगत आहे. ती तिच्या मैत्रिणींसोबत उत्तर भारतातील काही तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठीही गेली होती आणि दररोज ती सोशल मीडियावर तिच्या बोल्ड स्टाइलसाठी हेडलाइन बनवत असते.

हेही वाचा - ‘मन झालं बाजींद’ मधील अभिनेत्री श्वेता खरातचे परस्परविरोधी लूक्स!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.